गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन | Jitendra Awhad And BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Agitation News

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन

हिंगोली : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेण्याबाबत भाजपच्या वतीने बु्धवार (ता.पाच) निषेध आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. या वेळी भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार तथा भाजप ओबीसी मोर्चाचे (BJP Obc Morcha) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन घुगे, भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव रजनी पाटील, बाळासाहेब नाईक, उमेश नागरे, गजानन कावरखे, सुमीत धीके, लक्ष्मण थोरात, रितेश शहाणे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, राज्यातील ओबीसी विरोधी आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) निष्काळजीपणामुळे व उदासीन भूमिकेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्णतः स्थगित झालेले आहे. (BJP Held Agitation For Resignation Of Minister Jitendra Awhad Hingoli)

हेही वाचा: Hingoli : वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू, कळमनुरीतील घटना

राज्यातील गेल्या सहा महिन्यांत सात जिल्हा परिषद व १०६ नगरपंचायतींच्या निवडणुका या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवायच घेण्यात आल्या. एकीकडे ५२ टक्क्यांच्या वर असणाच्या ओबीसी समाजावर असा अन्याय महाविकास आघाडी सरकार करीत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही, असे वक्तव्य करून समस्त ओबीसींचा अपमान केलेला आहे. एकीकडे ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे दुष्ट काम करायचे व दुसरीकडे वरील प्रमाणे वक्तव्य करून समस्त ओबीसी समाजाला डिवचण्याचे काम करायचे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडी सरकारमधील मंत्र्यांची दिसून येते. वरील वक्तव्य करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समस्त ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी व आपण त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागून घ्यावा. अन्यथा भारतीय जनता पार्टी ओबीसी (Hingoli) मोर्चा तीव्र आंदोलन उभारेल असे निवेदनात नमुद केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :HingoliBjp
loading image
go to top