esakal | जेंव्हा भाजपा आमदार उचलतो मुस्लिमांच्या इज्तेमासाठी दगडगोटे
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

सीएए, एनआरसीच्या मुद्यावर देशात आणि देशाची राजधानी दिल्लीत अस्थिर परिस्थिती निर्माण झाली असतांना औशात मात्र मुस्लिम धर्माच्या जिल्हास्तरीय इज्तेमासाठी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार सभास्थळावरील दगड गोटे उचलताना दिसून आले.

जेंव्हा भाजपा आमदार उचलतो मुस्लिमांच्या इज्तेमासाठी दगडगोटे

sakal_logo
By
जलील पठाण

औसा (जि. लातूर) : सीएए, एनआरसीच्या मुद्यावर देशात आणि देशाची राजधानी दिल्लीत अस्थिर परिस्थिती निर्माण झाली असतांना औशात मात्र मुस्लिम धर्माच्या जिल्हास्तरीय इज्तेमासाठी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार सभास्थळावरील दगड गोटे उचलताना दिसून आले.

औशातील वानवडा मोडवर २३, २४ मार्चला मुस्लिम धर्माचा इज्तेमा होत आहे. आमदार श्री. पवार यांनी या ठिकाणाला भेट दिली, तेव्हा या जागेची सफाई सुरू होती. क्षणाचाही विलंब न करता श्री. पवार यांनी बाह्या मागे सारल्या आणि रानावर पडलेले दगडगोटे गोळा करू लागले. गोळा केलेले दगडगोटे ते उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत टाकत असलेले पाहून त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांनीही हातात झाडू घेत आणि दगड गोळा करीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

लातूर जिल्ह्याचा इजतेमा यंदा औसा तालुक्यात २३ व २४ मार्च ला होत आहे. या इजतेम्या साठी शहरापासून कांही अंतरावर असलेल्या वानवडा मोडवर जवळपास शंभर ते दीडशे एकर जमीन निवडण्यात अली आहे. यामध्ये बहुतांश जमीनमालक हिंदू आहेत. त्यांनी मोठ्या प्रेमाने या इज्तेमासाठी आपली जमीन आणि पाणी देण्याची तयारी दर्शविल्याने सभास्थळाची स्वछता दिवसरात्र केली जात आहे.

जिल्ह्याचा इज्तेमा औसा शहराजवळ होत असल्याचे ऐकून मुस्लिम समाजातील लोकांना कांही अडचणी आहेत का हे पाहण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी आले. त्यावेळी शेकडो स्वयंसेवक प्रार्थनास्थळाची सफाई करीत असल्याचे त्यांनी पाहिले आणि आमदार महोदय तडक या स्वयंसेवकात घुसले त्यांनी आजूबाजूला पडलेले दगड गोटे उचलायला सुरुवात केली आणि जवळच उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत ते टाकू लागले. 

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

आमदारांनी हातात दगड घेतल्याचे पाहून त्यांच्या सोबत आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांनी दगड वेचायला सुरुवात केली. श्रमदनांनतर श्री. पवार यांनी प्रार्थना स्थळावर उपस्थित असलेल्या जबाबदार (जिम्मेदार) लोकांशी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या आणि तातडीने फोनवर संबंधित अधिकाऱ्यांना फोन वरून त्या सोडवण्याचे निर्देश दिले.

भाजपच्या आमदारांनी मुस्लिम धर्माच्या इजतेम्या साठी श्रमदान करून औशात हिंदू मुस्लिम लोकात एकात्मता असल्याचे संबंध महाराष्ट्राला दाखविले. म्हणूनच आमदार श्री. पवार यांना विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मुस्लिमांची मते मिळाली होती. देशात काय चालू आहे हे आम्हाला माहिती नाही मात्र आम्ही औसेकर एक आहोत हाच संदेश या निमित्ताने बाहेर गेला.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

loading image