विरोधी पक्षांच्या विरोधात भाजपच्या खासदारांचे उपोषण

हरी तुगावकर
गुरुवार, 12 एप्रिल 2018

 विरोधकांनी तब्बल 23 दिवस हे अधिवेशन चालू दिले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदारांनी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात उपोषण करण्याचे आदेश दिले होते.

लातूर - विरोधी सदस्यांनी लोकसभेचे अधिवेशन चालू न दिल्याच्या निषेधार्थ खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली येथील गांधी चौकात गुरुवारी (ता. 12) सकाळपासून उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे. या
पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

लोकसभेचे अधिवेशन विरोधी सदस्यांनी चालू दिले नाही. यामुळे केंद्र शासनाला
अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. विरोधकांनी तब्बल 23 दिवस हे अधिवेशन चालू दिले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदारांनी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात उपोषण करण्याचे आदेश दिले होते. विरोधकांच्या एकाधिकारशाहीचा निषेध करण्यासाठी येथील गांधी चौकात गुरुवारी सकाळीपासूनच खासदार डॉ. सुनील गायकवाड हे उपोषणाला बसले आहेत. यासोबतच भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. नागनाथ निडवदे, लातूर शहराध्यक्ष शैलेश लाहोटी महापौर सुरेश पवार हेही उपोषणात सहभागी झाले आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: BJPs hunger strike against opposition parties