esakal | हिंगोलीत ‘महाराष्ट्र बचाव’चा नारा देत भाजपचे आंदोलन

बोलून बातमी शोधा

hingoli photo

कोरोना साथीच्या काळात राज्यशासन सपशल अपयशी ठरले आहे. मजूर उपाशी मरत असून शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केल्या जात नाही. रुग्णांना रुग्णसेवा मिळत नाहीआदी आरोप करीत जिल्हाभरात भाजपतर्फे हाताला काळी पट्टी बांधून राज्यशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. 

हिंगोलीत ‘महाराष्ट्र बचाव’चा नारा देत भाजपचे आंदोलन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : राज्य शासन विविध स्तरांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत येथे भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवारी (ता.२२) शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाभरात ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात आले.

कोरोना साथीच्या काळात राज्यशासन सपशल अपयशी ठरले आहे. मजूर उपाशी मरत असून शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केल्या जात नाही. रुग्णांना रुग्णसेवा मिळत नाही, पोलिस कर्मचारी साथीच्या रोगात बळी पडत आहेत. मजुरांना कामे नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

हेही वाचाआनंद वार्ता : हिंगोलीत आणखी पाच रुग्ण कोरोनामुक्त

‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत राज्यशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपतर्फे शुक्रवारी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात आले. सर्व भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या घरासमोर उभे राहात काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. 

भाजप पदाधिकाऱ्यांचा सहभाग

या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, संघटन सरचिटणीस फुलाजीराव शिंदे, ॲड. के. के. शिंदे, कैलासशेठ काबरा, सुनील जामकर, हमीदभाई प्यारेवाले, रजनीश पुरोहित, मोतीराम इंगोले, नंदकुमार नायक आदींनी सहभाग घेतला.

कळमनुरी येथे काळा पेहराव करून निषेध

कळमुनरी : कोरोना साथीच्या काळात विविध प्रश्नी राज्य शासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करीत शुक्रवारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शहरात हाताला काळी पट्टी बांधून तसेच काळ्या रंगाचा पेहराव करून निषेध नोंदविला. यामध्ये पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संजय कावडे, विद्याधर मगर, कुणाल खर्जुले, गजानन सातव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरामध्ये अन्य ठिकाणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.

सेनगावात काळे झेंडे दाखवून आंदोलन

सेगनाव ः सेनगाव येथे भाजपतर्फे शासनाच्या ध्येय, धोरणांचा निषेध करत ‘माझे अंगण माझे रणांगण’ या आदोलनाच्या माध्यमातून काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. या वेळी सेनगाव तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल, सूर्यभान ढेंगळे, साहेबराव तिडके आदी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

येथे क्लिक करासंतापजजक : प्रेमसंबंधात अडथळा; बारा वर्षीय मुलीला क्रुरतेने संपवले

हातात फलकही घेतले

जिल्हाभरात भाजपतर्फे आंदोलन करताना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्नी तयार करण्यात आलेले फलक हाती घेतले होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आंदोलन केले. या वेळी राज्यशासनाच्या धोरणांचा कडाडून विरोध केला. तसेच राज्यशासन विविधप्रश्नी अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. यात अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घरासमोर उभे राहून हाताला काळी पट्टी बांधून निषेध नोंदविला.