esakal | एका मॅसेजवर ४०२ जणांचे रक्तदान 

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र.

तालुक्यातील सामाजिक संस्थानी एकत्र येत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आवाहन केले. त्या एका मॅसेजवर मंगळवारी (ता.३१) घेण्यात आलेल्या शिबिसात तब्बल ४०२ जणांनी रक्तदान केले. 

एका मॅसेजवर ४०२ जणांचे रक्तदान 
sakal_logo
By
योगेश बरिदे

परतूर (जि.जालना) - आगामी काळात रक्ताची गरज निर्माण झाल्यास रक्तसाठा कमी पडू नये या उद्देशाने परतूर तालुक्यातील सामाजिक संस्थानी एकत्र येत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आवाहन केले. त्या एका मॅसेजवर मंगळवारी (ता.३१) घेण्यात आलेल्या शिबिसात तब्बल ४०२ जणांनी रक्तदान केले. 

राज्यात आगामी काळात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले होते .

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

या पार्श्‍वभूमीवर परतूर येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कुलमध्ये मंगळवारी तालुक्यातील विविध सामाजिक संघटना यांनी एकत्र येत सुजाण परतूरकर या बॅनर खाली रक्तदान शिबिर घेतले. औरंगाबाद येथील तीन रक्तपिढ्या या शिबिरात रक्तसंकलनासाठी पाचारण करण्यात आल्या. शिबिरासाठी साडेपाचशेहुन अधिक जणांनी रक्तदान करण्यासाठी नोंदणी केली होती, मात्र बॅग उपलब्धतेप्रमाणे ४०२ जणांनाच रक्तदान करता आले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिबिरात खबरदारी बाळगण्यात आली होती. सर्वांना मास्क लावून येणे बंधनकारक केले होते. तसेच सुरक्षीत अंतर ठेऊनच सर्वजण होते.

हेही वाचा :  कोल्हापूरहून आलेल्या ऊसतोड मजूरांची तपासणी

या शिबिराला माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी आमदार सुरेश जेथलिया, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी भेट दिली. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी शहरातील डॉक्टर, वकील,शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले. 

नगराध्यक्षांचेही रक्तदान 

रक्तदान शिबिरात अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. परतूरच्या नगराध्यक्षा विमलताई जेथलिया, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनीही रक्तदान केले 

रक्त संकलनाच्या बॅग कमी असल्याकारणाने अनेक जण रक्तदान करण्यापासून वंचित राहिले आहे. पुढील १५ दिवसात पुन्हा अशाच प्रकारचे शिबिर राबविण्यात येणार आहे. त्या वेळेस नागरिकांनी रक्तदान करावे. 
- संजय चव्हाण 
समन्वयक, रक्तदान शिबिर