esakal | कोल्हापूरहून आलेल्या ऊसतोड मजूरांची तपासणी 
sakal

बोलून बातमी शोधा

जालना : जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी रांगेत उभे ऊसतोड कामगार. 

कोल्हापुर जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या ऊसतोड कामगारांनी शुक्रवारी (ता.२७) रात्रींतूनच आपल्या मुलांबाळासोबत एका ट्रक मधून जालना जिल्ह्याची सीमा गाठली. शनिवारी या सर्वांना जिल्ह्याच्या सीमेवर अडवण्यात आले. तपासणीसाठी त्यांना थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.

कोल्हापूरहून आलेल्या ऊसतोड मजूरांची तपासणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना -  जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असताना कोल्हापूर जिल्हयात ऊसतोडणीसाठी गेलेले ३५ ऊसतोड मजूर शनिवारी (ता.२८) जालना जिल्ह्यात परतले. सीमाभागावर चेक पोस्टवर तैनात पोलिसांनी त्यांना अडवून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. दरम्यान, सर्वांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. 

हेही वाचा :  चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापूर 

कोल्हापुर जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या ऊसतोड कामगारांनी शुक्रवारी (ता.२७) रात्रींतूनच आपल्या मुलांबाळासोबत एका ट्रक मधून जालना जिल्ह्याची सीमा गाठली. शनिवारी या सर्वांना जिल्ह्याच्या सीमेवर अडवण्यात आले.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

तपासणीसाठी त्यांना थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत कुणालाही कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली नाहीत. त्यांना अलगीकरण करून राहण्याचे सांगण्यात आले आले आहे. 

वाहन चालकाची झाली पंचाईत 

सीमा बंदी असताना ऊसतोड कामगारांना घेऊन आलेल्या वाहन चालकाची जाताना मोठी पंचाईत झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच इंधन देण्याचे आदेश दिले आहे . त्यामुळे परत कोल्हापूरकडे जायचे कसे ? असा प्रश्न वाहन चालकाला पडला आहे . तसेच सीमा बंदी केल्यामुळे पोलिसही जागोजागी अडवणार असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. 

loading image
go to top