गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान, गोपीनाथ गडावर भजनाचा कार्यक्रम

प्रवीण फुटके
Sunday, 13 December 2020

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता.१२) गोपीनाथगडासह जिल्ह्यात रक्तदान शिबीरे झाली.

परळी (जि.बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता.१२) गोपीनाथगडासह जिल्ह्यात रक्तदान शिबीरे झाली. गडावर भजनाचाही कार्यक्रम पार पडला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही रक्तदान करुन भजनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून चाहते सकाळपासून गडावर पोचत होते. गोपीनाथ गडाला विविध प्रकारच्या फुल माळांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने सजविण्यात आले. पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रीतम मुंडे, डॉ.अमित पालवे, गौरव खाडे यांनी दुपारी गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

दरम्यान ता.१२ ते १५ डिसेंबर दरम्यान रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या पंकजा मुंडे यांच्या आवाहनानुसार गोपीनाथगडासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे झाली. गडावर माजी मंत्री महादेव जानकर, खासदार भागवत कराड, खासदार सुजय विखे, आमदार रमेश कराड, आमदार मोनिका राजळे, आमदार लक्ष्मण पवार, आमदार राजेश पवार, आमदार श्वेता महाले, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, गोविंद केंद्रे, फुलचंद कराड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, देविदास राठोड, भाऊराव देशमुख, लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे, संजय कौडगे, अरूण मुंडे, प्रवीण घुगे आदींची उपस्थिती होती.

मोठी खुर्ची हटवून मुख्यमंत्री ठाकरे बसले साध्या खुर्चीवर, आपणही सामान्य असल्याचा दिला संदेश

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood Donation Camps On Gopinath Munde Jayanti Beed News