दोन विभागाच्या परीक्षा एकाच दिवशी, परीक्षार्थी न्यायालयात

सुषेन जाधव
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता व मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदांसाठीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने वेळापत्रकात बदल करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर वेळापत्रकात बदल करता येईल का, यासंदर्भात माहिती घेण्याचे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. प्रकरणात न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांच्यासमोर शुक्रवारी (ता.22) सुनावणी होणार आहे. 

या प्रकरणात प्रेम दराडे यांच्यासह पाच परिक्षार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता (सिव्हील ग्रेड बी) या पदासाठी जाहीरात काढली होती. मात्र जाहीरात काढताना परिक्षेची तारिख निश्‍चित करण्यात आली नव्हती. तसेच मुंबई महापालिकेने ऑक्‍टोबर 2019 मध्ये कनिष्ठ अभियंता (सिव्हील ग्रेड बी) या पदासाठी जाहीरात दिली होती. तसेच या परिक्षेची तारीख 25 नोव्हेंबर निश्‍चित केली होती.

तारखात बदल करण्याची विनंती

जलसंपदा विभागाने ता. 25 आणि 26 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात सदर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे जाहीर केले. प्रकरणात परिक्षार्थ्यांनी 12 नोव्हेंबररोजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी तसेच जलसंपदा विभागाचे सचिव, आणि मुंबई महापालिका आयुक्त यांना ईमेलद्वारे परीक्षांच्या तारखात बदल करण्याची विनंती केली.

कशामुळे? वाचा - उद्धव ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादेत तक्रार

मात्र, जलसंपदा व महापालिकेतर्फे प्रतिसाद मिळाला नाही. परिक्षार्थ्यांनी 12 नोव्हेंबररोजी गुरुनानक जयंतीनिमीत्त सार्वजनिक सुट्टी असल्याचे समजून पुन्हा 16 व 17 नोव्हेंबर असे दोन दिवस संबंधित विभागांना ईमेलद्वारे कळविले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. या नाराजीतून परिक्षार्थ्यांनी ऍड. रुपेश जैस्वाल व ऍड. दिगंबर शिंदे यांच्यातर्फे खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. शासनातर्फे ऍड. सिद्धार्थ यावलकर काम पाहत आहेत. 

व्हिडिओ पहा आणि वाचा - का फोडत आहेत हे तरूण बीएमडब्ल्यू

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC, Water Resourses Department Exams on Same Day