esakal | चिंचोर्डी येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह आढळला
sakal

बोलून बातमी शोधा

drown

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह आढळला

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी : तालुक्यातील चींचोर्डी येथे ओढ्याच्या पाण्यात शनिवार ता. चार वाहून गेलेल्या सहा वर्षीय मुलीच्या शोधासाठी प्रशासन सर्व गावांमधील नागरिकांनी रात्रभर शोधमहीम हाती घेतल्यानंतर सुमारे पंधरा तासानंतर रविवार ता. पाच सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान या चिमुकलीचा मृतदेह घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर आढळून आला. (Hingoli News)

कळमनुरी तालुक्यातील अनेक भागात काल पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसामुळे परिसरातील ओढे नाले भरून वाहिले चींचोर्डी परिसरातही मोठा पाऊस झाला या पावसामुळे गावालगत असणारा ओढा भरून वाहू लागला होता या ओढ्यावर असलेला वंजारवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नळीचा पुल तुटलेला आहे त्यामुळे पलीकडच्या भागात शेती असणाऱ्या गावातील नागरिकांकडून ओढयामधील पायवाटेचा वापर केला जातो शनिवारी गावातील भारत संतोष पाईकराव, पत्नी दयाबाई पाईकराव, यशोदा बालाजी पाईकराव ही आपली नात संध्या आकाश तागडे वय सहा यांच्यासमवेत शेताकडे गेले होते.

मात्र दुपारच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे पाईकराव कुटुंबीयांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला गावाकडे येत असताना गावालगतच असलेला ओढा भरून वाहत होता साधारणपणे पंचवीस ते तीस फूट रुंद पात्र असलेल्या ओढ्या मधून एकमेकांचे हात धरून ओढा पार करताना संध्या तागडे हिचा हात सुटल्या गेला व ती ओढ्याच्या पाण्यात वाहून गेली आजी आजोबा सोबत असलेल्या यादवराव मस्के यांनी संध्या हिला वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.

हेही वाचा: 'सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय', राज ठाकरेंची टीका

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक शरदराव मस्के, रमेश राऊत, प्रभाकर मस्के, गजानन मस्के, अशोक नाईक, नागोराव खुडे, मधुकर कुरुडे, खांडबाराव कुरुडे, भिमराव पाईकराव, सुनील पाईकराव, दादाराव मस्के, विजय पाईकराव, यांच्यासह गावकऱ्यांनी शोध मोहीम हाती घेतली घटनेची माहिती मिळताच प्रभारी तहसीलदार श्रीराम पाचपुते मंडळ अधिकारी श्री नाईक अमोल पतंगे, संदीप गाभणे हे ही घटनास्थळी दाखल झाले मात्र पाण्याचा प्रवाह व रात्र झाल्यामुळे शोध मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांनी ओढ्याच्या परिसरात तीन किलोमीटरपर्यंत पाहणी केली.

गावकऱ्यांनी सकाळीच शोध मोहीम हाती घेतली गावकरया समवेत पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, कर्मचारी प्रशांत शिंदे, गणेश सूर्यवंशी, भरत घ्यार, माधव भडके, शिवचरण बेगडवार, शिवाजी देमगुंडे, रवींद्र राठोड, किशोर खिलारे, शशिकांत भिसे, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते समशेर पठाण हेही शोध मोहिमेत सहभागी झाले दरम्यान सकाळी ओढ्याचे पाणी काही प्रमाणात कमी झाल्यामुळे नागरिकांना शोध घेता आला.

हेही वाचा: मुलांच्या मनावरचा ताण शोधा! 13 प्रश्नांमधूनच मिळू शकते उत्तर

दरम्यान घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर संध्या आकाश तागडे हिचा मृतदेह आढळून आला. पोलीस प्रशासनाने घटनास्थळ पंचनामा करून संध्या हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरी येथे उपजिल्हा रुग्णालयात आणला दरम्यान संध्या आकाश तागडे आपल्या आजी आजोबा कडे वास्तव्याला होती. तिचे नेमकेच गावांमधील शाळेत इयत्ता पहिली मध्ये नाव टाकले होते. तिच्या अकाली मृत्यूमुळे गावामधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top