महत्त्वाची बातमी : माजलगाव नगरपालिकेतील १८२ सफाई कर्मचाऱ्यांवर संक्रांत 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

नगरपालिकेमध्ये मागील वीस वर्षांत कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी काम करत होते. वास्तविक पाहता १८२ रोजंदारीवरील कर्मचारी दाखवून त्यांचा पगार एका ठेकेदाराला अदा करण्यात येत होता. यामुळे या कर्मचाऱ्यांचा पगार पालिकेला करावा लागत असल्याने पालिकेस आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.

माजलगाव (बीड) :  नगरपालिकेमध्ये १८२ बेकायदेशीर व बोगस रोजंदारी कर्मचारी काम करत असून, याचा पालिकेवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी पालिकेतील १८२ रोजंदारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेतून कमी करण्याचे आदेश दिल्याने हे कर्मचारी कमी होणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आता संक्रांत कोसळणार आहे. 

औरंगाबादचा वाढतोय कोरोना मीटर, आज ७२ रुग्ण सापडले, ७८० बाधितांवर उपचारही आहेत सुरू   

नगरपालिकेमध्ये मागील वीस वर्षांत कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी काम करत होते. वास्तविक पाहता १८२ रोजंदारीवरील कर्मचारी दाखवून त्यांचा पगार एका ठेकेदाराला अदा करण्यात येत होता. यामुळे या कर्मचाऱ्यांचा पगार पालिकेला करावा लागत असल्याने पालिकेस आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. या कर्मचाऱ्यांचा पगार हा जावेद इनामदार किंवा बाबू या सफाई मुकादम यांच्या नावाने धनादेश काढून मागील चार वर्षांच्या कालावधीत केलेले आहेत.

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा  

यामुळे बेकायदेशीररीत्या व बोगस रोजंदारीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून नगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड लादला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार प्रकाश सोळंके यांनी सात एप्रिलला तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत वर्ष २००० पासून जेवढे कर्मचारी रोजंदारीवर कामाला होते. त्या सगळ्यांना आतापर्यंत दिलेले वेतन, मानधन यांची रक्कम व त्या- त्या वेळच्या मुख्याधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्याला दिलेली मान्यता यांच्या नावासहित परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

रिकामे हात अन् हवालदिल मन...मजुरांची अशीही व्यथा   

हे सांगतात आकडे 
नगरपालिकेत फिल्टरवर २४, फिक्स पे वसुली कर्मचारी पाच, विद्युत विभाग सहा, अग्निशमन दल १५, तात्पुरते साफसफाई कर्मचारी ९२ तसेच नगराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष यांच्या वैयक्तिक कामावर ४० असे एकूण १८२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सदरील बोगस कर्मचाऱ्यांवर आता संक्रांत कोसळणार आहे. 

सदरील आदेश निघाल्याची माहिती मिळाली आहे. आदेशात काय नमूद केले आहे ते पाहिले नसून आदेश पाहिल्यानंतरच त्यावर भूमिका घेता येईल. 
प्रशांत पाटील, प्रभारी मुख्याधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bogus salaried Employees action by collector