परभणी जिल्ह्यात रविवारी दोघे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणुची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. मुंबई - पुणे या महानगरातून आलेल्या लोकांमुळेच जिल्ह्यातील रुग्ण संख्या इतक्या झपाट्याने वाढू लागली आहे.

परभणी : कोरोना विषाणु संसर्गाची लागण झालेले अजून दोन रुग्ण रविवारी (ता.३१) परभणी शहरात सापडले आहेत. आता रुग्णांची एकूण संख्या ८२ झाली आहे.
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणुची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. मुंबई - पुणे या महानगरातून आलेल्या लोकांमुळेच जिल्ह्यातील रुग्ण संख्या इतक्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे परभणी जिल्हावासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. रविवारी (ता.३१) परभणी शहरात दोन रुग्ण आढळून आले आहेत. यात त्रिमुर्तीनगरमध्ये एक व मातोश्रीनगरमध्ये एका रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण रुग्ण संख्या ८२ झाली आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

दरम्यान, परभणी जिल्ह्यात शनिवारी (ता.२९) सकाळी वाघी बोबडे (ता.जिंतूर) येथील एका साठ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्का बसला होता. या धक्क्यातून परभणीकर सावरतो न तोच शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये परभणी शहरातील इटलापूर मोहल्ला भागातील तीन तर जिंतूर तालुक्यातील सांवगी भांबळे येथील दोन आणि गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. दिवसेन दिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.  

हेही वाचा -कळमनुरीत बारा हजार गावकऱ्यांची घरवापसी -

जिल्हा रुग्णालयाचा हलगर्जीपणा
वाघी बोबडे (ता.जिंतूर) येथील कोरोनाबाधित एका साठ वर्षे व्यक्तीचे शनिवारी (ता.३०) निधन झाले. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात तब्बल दोन ते अडीत तास उशिर झाला. जिल्हा रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सदरील व्यक्तीच्या अंत्यसंस्कार तब्बल दोन तास विलंब झाला, असा आरोप यावेळी करण्यात आला. निधन झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा नियम तयार करण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार होणे गरजेचे आहे. महापालिकेच्या पथकासह शववाहिका सकाळी सव्वासातच्या सुमारास अमरधाम स्मशानभूमीत पोचली होती. परंतु रुग्णवाहिकेतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुद्धा तिथे शासकीय रुग्णालयाचे वाँर्ड बाँय अथवा अन्य कुणी नव्हते. पालिका कर्मचाऱ्यांनी संबंधीत यंत्रणेकडे संपर्क साधून दोन तास प्रतिक्षा केली. परंतू, कुणाला पाठवण्यासाठी हतबलता दाखवल्यानंतर अंतिम संस्कार करण्याचे ठरले. तो पर्यंत तो मृतदेह रुग्णवाहिकेत दोन तास पडून होता. दोन तासाच्या त्यानंतर पीपीई किट, मास्क घातलेल्या त्या व्यक्तीचा मुलगा व अन्य एक अशा दोघांनीच मृतदेह सरणावर ठेवला. 

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात बरसला पाऊस -

परभणी कोरोना मिटर
एकूण रुग्ण - ८२
उपचार सुरु - ७९
घरी सोडले - एक
मृत्यू - दोन
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both positive in Parbhani district on Sunday Parbhani News