पुण्याहून गावी परतताना रस्त्यातच प्रेयसीवर अॅसिड व पेट्रोल टाकून जाळले. 

crime logo.jpg
crime logo.jpg

नेकनूर (बीड) : बीड तालूक्यातील नेकनूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येळंब (घाट) परिसरात एक बावीस वर्षीय तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली असून पुण्यावरून गावी परतत असताना मध्येच प्रियकराने आपल्या प्रियसीला पेट्रोल व अॅसिड टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीस आली. 

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालूक्यातील शेळगावातील सावित्रा डिंगबर अंकूरवर वय २२ वर्ष ही गावातीलच अविनाश रामकीसन राजुरे (२५) वर्ष याच्यासोबत गेल्या वर्षभरापासून पूण्यात रिलेशनशिप मध्ये राहत होती. शुक्रवारी (ता.१३) रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात एका खडी क्रेशर जवळ सदरील जोडपे मुक्कामास थांबले. पहाटेच्या सुमारास प्रियकराने आपल्या प्रियसीचा सुरवातीला गळा दाबून, अॅसीड टाकले यानंतर पेट्रोल टाकून अमानुषपणे आग लागली. तेथून आरोपी पसार झाला. 

पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सदरील तरुणी तडफडत राहिली. दुपारी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची तिच्यावर नजर पडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी स्वतःच्या गाडीतून नेकनूर आणि नेकनूरमधून अॅम्बुलन्सने बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अॅसीड हल्ला आणि पेट्रोलने ४८ टक्के शरीर भाजले. प्रकृती स्थिर आहे असून  पीडीतेच्या जवाबावरून आरोपी अविनाश रामकीसन राजुरे याच्यावर नेकनूर ठाण्यात कलम ३०७/३२६ अ-गुन्हा नोंदवण्यात आला असून सदरील प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव हे करत असून सहायक्क पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध वेगात सुरू आहे. 

प्रियसीला पेटवून प्रियकर पळाला

येळंब घाट शिवारात एक जोडपे मुक्कामी थांबले. पहाटेच्या सुमारास प्रियकराने आपल्या प्रियसीचा गळा दाबून अॅसिड टाकले तो प्रियकर एवढ्यावरच न थांबता त्याने चक्क पेट्रोल टाकून तिला जाळून टाकून तेथून पसार झाला.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com