esakal | ब्रेकिंग न्यूज : लातूर जिल्हा हादरला, बारा परप्रांतीयापैकी आठ कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

latur news

निलंगा येथील एका धार्मिक स्थळात ते मुक्कामी थांबल्याची कानोकान खबर कोणालाच मिळाली नाही. पण शुक्रवारी मात्र परराज्यातील बारा व्यक्ती निलंग्यात येवून थांबल्याची माहिती सर्वत्र पसरली. महसूल प्रशासन व पोलिसानाही याची माहिती मिळताच त्यांची झोपच उडाली.

ब्रेकिंग न्यूज : लातूर जिल्हा हादरला, बारा परप्रांतीयापैकी आठ कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानासुद्धा नागरीकांचा या राज्यातून त्या राज्यात प्रवास काही केल्या थांबत नाही. असाच एक प्रकार निलंगा येथे घडला आहे. गुरुवारी परराज्यातून बारा नागरिक एका वाहनाने आले. रात्रभर राहिले. याची कानोकान कोणालाही खबर नव्हती. पण शुक्रवारी सकाळी वाऱ्यासारखी ही बातमी सर्वत्र पसरली.

प्रशासन व पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे स्वॅबचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवले होते. या पैकी आठ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने लातूर जिल्हा हादरला आहे. या वृत्ताला महसूल व पोलिस यंत्रणेने दुजोरा दिला आहे. नमुने पॉझिटिव्ह आल्याने आता लातूरकरांची झोप उडाली आहे.

नंदियाल (जि. कर्नूल, तेलंगणा) येथील बारा जण हरियानातील फिरोजपूर या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी तेथील महसूल यंत्रणेकडून पास घेतला आणि परतीचा प्रवास खासगी वाहनाने सुरु केला होता. आठ-नऊ दिवसापूर्वी हरियानातून निघालेले हे लोक आतापर्यंत तेलंगणात जाणे आवश्यक होते. पण ते गुरुवारी (ता. दोन) उस्मानाबाद येथून निघून ते निलंगा येथे आले. 

... आणि प्रशासनाची झोप उडाली

निलंगा येथील एका धार्मिक स्थळात ते मुक्कामी थांबल्याची कानोकान खबर कोणालाच मिळाली नाही. पण शुक्रवारी मात्र परराज्यातील बारा व्यक्ती निलंग्यात येवून थांबल्याची माहिती सर्वत्र पसरली. महसूल प्रशासन व पोलिसानाही याची माहिती मिळताच त्यांची झोपच उडाली. तातडीने या व्यक्ती ज्या ठिकाणी राहिल्या त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱयांनी भेट दिली. त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हरियानातून घेण्यात आलेल्या परवान्याची शहानिशा करण्यात आली. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

परराज्यातून आल्याने त्यांना तातडीने लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅबचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. शनिवारी नमुन्याचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला. या बारापैकी आठ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा, प्रशासन, व पोलिस यंत्रणेसोबतच लातूरकरांची झोप उडाली आहे. संपूर्ण जिल्हा या बातमीने हादरून गेला आहे.

loading image