esakal | उमरग्यातील चोरीचा अजब प्रकार, चोरटा सीसीटीव्हीत कैद
sakal

बोलून बातमी शोधा

chor.jpeg

उमरग्य़ातील बल्ब चोरीला वेग आला आहे, चालू बल्ब काढूल नेणारी गॅंग कार्यरत झाली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.  

उमरग्यातील चोरीचा अजब प्रकार, चोरटा सीसीटीव्हीत कैद

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : शहर व तालुक्यात चोरीचे सत्र अलीकडच्या काळात कमी झाले. दरम्यान, काही भुरट्या चोरट्यांकडून बल्ब चोरी करण्याचा अजब प्रकार शहरात घडत आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी त्रस्त झाले आहेत. गुरुवारी (ता. २९) सकाळी सहाच्या सुमारास शासकीय विश्रामगृह परिसरातून एका व्यक्तीने बल्ब चोरी केल्याचे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात दिसून येत आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

लॉकडाउनच्या काळात सर्व काही शांत असल्याने चोरांचे प्रकारही थांबले होते. आता महिनाभरापासून बाजारपेठ खुली झाल्याने सर्वत्र वर्दळ वाढली आहे. दिवाळी सणाची कमी-अधिक प्रमाणात लगबग सुरू झाली आहे. चोरांनी आता सणासुदीच्या दिवसांत हात साफाई सुरू केली आहे. कवठ्यातील घरफोडीत चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज लांबविला. त्याचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, शहरातील इंदिरा चौकात दोन दिवसांपूर्वी एका दुकानासमोरील चालू बल्ब चोरून नेताना एक महिला सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राष्ट्रीय महामार्गालगत एका कुशन मेकरच्या दुकानासमोरील एक बल्ब चोरीला तर एक ट्यूब लाइट फोडण्यात आली. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास एक व्यक्ती दुचाकीवर शासकीय विश्रामगृह परिसरात आली आणि तिने बिनधास्तपणे विश्रामगृहाच्या मुख्य गेटसमोर पाहणी करून नवीन बल्बची चोरी केली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)