
तत्कालीन प्रशिक्षीत मुख्याधिकारी सुहास खोडवेकर यांनी मागील काळात शहरातील बसस्थानक, चौबारा रोड, जयजवान चौकातील अनाधिकृत बांधकाम पाडून मोठी कार्यवाही केली होती.
उदगीर (लातूर) : बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आलेले अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे मंगळवारी ( ता.१५) नगर परिषद बुलडोझर लावून अनाधिकृत बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे अनाधिकृत बांधकामधारकाचे धाबे दणाणले आहेत.
हे ही वाचा : शेतकरी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दानवे म्हणाले, मी हाडाचा शेतकरी
तत्कालीन प्रशिक्षीत मुख्याधिकारी सुहास खोडवेकर यांनी मागील काळात शहरातील बसस्थानक, चौबारा रोड, जयजवान चौकातील अनाधिकृत बांधकाम पाडून मोठी कार्यवाही केली होती. त्यावेळी शिवाजी सोसायटीतील बांधकाम पाडत असल्यामुळे चंद्रपाल प्रभातराव पाटील यांनी १४ जून २०१९ रोजी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पुढील सुनावनी होईपर्यत कुठलेच बांधकाम पाडण्यात येऊ नये, असा आदेश दिल्यामुळे नगर परिषदेने अनाधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम थांबली होती.
हे ही वाचा : Success Story: नोकरी सोडली अन् झाले आयएएस, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांचा प्रेरणादायी प्रवास
२१ नोहेंबर रोजी नगर परिषद प्रशासनाची बाजू लक्ष्यात घेऊन बसस्थानकासमोरील मुख्य रस्तालगतच्या सार्वजनिक रस्तावरील अतिक्रमण एक महिन्याच्या आत काढून टाकण्याचा आदेश होता. तेच आदेश दोन डिसेंबर रोजी नगर परिषदेला प्राप्त झाल्याने नगर परिषदेच्या पथकाने अनाधिकृत बांधकाम पाडण्याची धडक कार्यवाही करण्यात आली आहे. यावेळी नगर परिषदेच्या पथका सोबत मुख्याधिकारी भरत राठोड उपस्थित राहून कार्यवाही करत आहे. यावेळी कुठलाच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले