esakal | दिवाळीसाठी गावी गेले अन् चोरट्यांनी घरच खाली केले; गारखेडा परिसरात दोन लाखांची घरफोडी
sakal

बोलून बातमी शोधा

gharfodi.jpg

गारखे़डा परिसरातील रेणुकानगरात घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. घरातील सर्व सदस्य दिवाळीनिमित्त गावी गेलेले होते. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच कडी कोंडा तोडून घरातील दागदागीने चोरले. ही बाब समोर येताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिवाळीसाठी गावी गेले अन् चोरट्यांनी घरच खाली केले; गारखेडा परिसरात दोन लाखांची घरफोडी

sakal_logo
By
प्रताप अवचार

औरंगाबाद : दिवाळी सणासाठी मुळ गावी गेलेल्या कुटुंबियांच्या औरंगाबादेतील गारखेडा परिसरातील घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली असून जवऴपास दोन लाखांचे दागीन्यावर चोरांनी डल्ला मारला आहे. यासंदर्भात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक मुळे हे पुढील तपास करीत आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गारखेडा परिसरातील रेणुकानगर प्लॉट नंबर 221 मध्ये उषा देविदास शिंदे (वय-45) या आपल्या कुटुंबिंयांसमवेत राहतात. मागील दीड महिन्यांपासून त्या आपल्या मुळगावी (शिंदेफऴ, ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) येथे गेल्या होत्या. त्यांचा मुलगा दिनेश शिंदे हा शिक्षणासाठी औरंगाबादेतच राहत असे. रविवारी (ता.15) दिनेश शिंदे हा दिवाळी सणासाठी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान गावाला गेला. सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान दिनेश हा शिंदेफऴ या आपल्या मुळगावात पोहचला. रात्री अकरा वाजेच्या दरम्यान शिंदे यांचे औरंगाबादेतील भाडेकरु रविंद्र बनकर यांचा फोन आला. गेटचे व घराच्या दरवाज्याचे लॉक तोडलेले दिसत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. माहिती मिळताच शिंदे कुटुंबिय रात्रीच औरंगाबादेत पोहचले. घराची पाहणी केली असता घरातील कपडे अस्थव्यस्त पडलेले होते. रिकाम्या ड्रममध्ये ठेवलेले दागीने दिसून आले नाही. त्यामुळे अज्ञातांनी घरफोडी केल्याचे निश्चित झाले. फिर्यादी उषा शिंदे यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चोरी गेलेल्या सामानात याचा आहे समावेश 
शिंदे यांच्या घरातून चोरी गेलेल्या सामानात खालील दागीन्यांचा समावेश आहे. यासर्व वस्तूंची तक्रारीत नोंद करण्यात आली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  •  तीस हजार किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे नेकलेस. 
  •  90 हजार रुपये किमतीचा पसत्तीस ग्रॅम वजनाचा अखंड शॉंट गंठण त्यात मध्यभागी असलेला पेंडॉल
  •  पंधरा हजार रुपय किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुंबर.
  •  सत्तावीस हजार रुपय किमतीचे सोन्याची चैन, कानातील कुडके.
  •  दहा हजार रुपये किमतीचे लहान बाळाचे चांदीचे हातातील चार कडे, पायातील चांदीचे एक कड आदी दागीन्यांची चोरी झाली आहे. वरिल सर्व दागीन्यांची रक्कम जवळपास पाऊने दोन लाखापर्यंत आहे. अन्य साहित्य देखील चोरी गेल्या असल्याचा अंदाज आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)