
रस्ते रोज स्वच्छ केले जात आहेत. दुभाजकात लावलेल्या झाडांची योग्य पद्धतीने वाढ व्हावी, यासाठी त्यांची छाटणी करून पाणी दिले जात आहे. याकामी नागरिक व व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
लातूर : शहरातील मुख्य रस्ते आणि इतर रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकात कचरा टाकल्यानंतर आता महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वारंवार सूचना देऊनही दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रकार घडत असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा : Bharat Bandh: परळीत कडकडीत बंद, महाविकास आघाडीच्या वतीने दुचाकी फेरी
लातूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी महानगरपालिका वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. घरोघर कचरा संकलन तसेच हॉटेल व दुकानातील कचरा संकलनासाठी रात्रीही वाहने पाठवली जात आहेत. रस्ते रोज स्वच्छ केले जात आहेत. दुभाजकात लावलेल्या झाडांची योग्य पद्धतीने वाढ व्हावी, यासाठी त्यांची छाटणी करून पाणी दिले जात आहे. याकामी नागरिक व व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
हे ही वाचा : मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठीयेथे क्लिक करा
दुभाजकात झाडे लावलेली असतानाही अनेक व्यावसायिक व नागरिक त्यात कचरा टाकत आहेत. यामुळे झाडे खराब होत असून दुभाजकात कचरा साठत आहे. रोज कचरा उचलूनही पुन्हा तो साठत असल्याने महानगरपालिकेने आता दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. रोज घंटागाडी येत असतानाही दुभाजकात कचरा टाकल्याचे आढळल्यास संबंधित व्यावसायिक अथवा नागरिकास दंड केला जाणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपले घर अथवा दुकानातील कचरा घंटागाडीकडे द्यावा. दुभाजकात तो टाकू नये. दुभाजकात कचरा टाकला तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले