Coronavirus : कर्तव्यावर गैरहजर; राज्य राखीव बलातील चार जवानांवर गुन्हा दाखल 

उमेश वाघमारे 
Thursday, 16 July 2020

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच राज्य राखीव बलाच्या तुकड्याही बंदोबस्त कामी मुंबई, मालेगाव आदी ठिकाणी पाठविल्या जात आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीने आता राज्य राखीव बलाचे काही कर्मचारीही कर्तव्यावर गैरहजर राहत आहेत.

जालना : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच राज्य राखीव बलाच्या तुकड्याही बंदोबस्त कामी मुंबई, मालेगाव आदी ठिकाणी पाठविल्या जात आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीने आता राज्य राखीव बलाचे काही कर्मचारीही कर्तव्यावर गैरहजर राहत आहेत. अशाच कर्तव्यावर गैरहजर राहिलेल्या राज्य राखीव बलाच्या चार जवानांवर गुरूवारी (ता.१६) सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

 
जालना येथील राज्य राखीव बलाच्या तुकड्या कोरोना बंदोबस्तासाठी मुंबई, पुणे, मालेगाव आदी ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशानंतर पाठविल्या जातात. मात्र, मुंबई, पुणे आणि मालेगाव येथे कोरोनाचा विळखा अधिक आहे. त्यामुळे यापूर्वी ही राज्य राखीव बलाचे जवाण कोरोना बंदोबस्तावरून पळून जालना शहरात आले होते. त्यांच्यावर राज्य राखीव बलाने कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पुन्हा राज्य राखीव बलाचे चार जवान हे कर्तव्यावर हजर न झाल्याने त्यांच्यावर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

यात राज्य राखीव बलाचे किरोश लक्ष्मण कमडे, दीपक संभाजी डुरे,  विजय किसन म्हस्के, गजानन बाबुराव सोळूंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या चार ही जवानांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठी राज्य राखीव बलाने तीन नोटीसा बजावल्या होत्या. तसेच त्यांच्या मोबाइलवर संपर्क केला होता.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

मात्र, तरी देखील ते कर्तव्यावर हजर न झाल्याने त्यांच्या विरोधात कर्तव्यावर गैरहजर राहिल्या प्रकरणी वरिष्ठांच्या आदेशानंतर राज्य राखीव बलाचे पोलिस निरीक्षक शेख अक्बर शेख मुसा यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(संपादन : प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charge filed agains four State Reserve Force