esakal | तुम्ही जर कमी केलं असेल चिकन खाणं, तर तुमच्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

सोशल मिडियावरील चुकीच्या पोस्टमुळे महाराष्ट्रात चिकन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. असेच चित्र लातूर शहर व जिल्ह्यातही दिसून आले. शहरात दैनंदिन १० ते १२ टन चिकनची मागणी तर जिल्हाभरात साधारणतः ३० ते ३२ टन मागणी असते.

तुम्ही जर कमी केलं असेल चिकन खाणं, तर तुमच्या...

sakal_logo
By
सुशांत सांगवे

औरंगाबाद : चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होत असल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचल्याने या व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे. चिकनबरोबरच गेल्या काही दिवसांपासून अंडी खरेदीसुद्धा मंदावली आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यांत साडेपाच ते सहा कोटी रुपयांचा तोटा शहर आणि जिल्ह्यातील व्यावसायिकांना बसला आहे.

सोशल मिडियावरील चुकीच्या पोस्टमुळे महाराष्ट्रात चिकन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. असेच चित्र लातूर शहर व जिल्ह्यातही दिसून आले. शहरात दैनंदिन १० ते १२ टन चिकनची मागणी तर जिल्हाभरात साधारणतः ३० ते ३२ टन मागणी असते.

लातूरला कधी होणार चिकन महोत्सव

मागील दीड महिन्यातील

  • चिकनचे दर - ८० ते १०० रूपये किलो
  • आत्ताचे दर - १३० ते १४० रुपये किलो

मात्र, ही मागणी ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घसरली. त्यामुळे चिकन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून आले. म्हणूनच गेल्या दीड महिन्यात साडेपाच ते सहा कोटी रुपयांचा फटका व्यावसायिकांना बसला असल्याचे स्पष्ट होत आहे. पण, हे चित्र आता हळूहळू बदलण्यास सुरवात झाली आहे.

उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी

यासंदर्भात चिकन व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष जाफर शेख यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात आम्हा व्यावसायिकांचा खरा सीझन असतो. मात्र याच कालावधीत चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो, अशी अफवा सगळीकडे पसरली गेली. त्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. बाजारात दिवसभर शुकशुकाटाचे वातावरण असायचे.

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

पण, आता जनजागृती वाढू लागल्याने नागरिक पुन्हा चिकन खरेदीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे बाजारपेठ पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे, असे म्हणता येईल. मागील दीड महिन्यांत चिकनचे दर ८० ते १०० रूपये किलोपर्यंत खाली आले होते. तरीही ग्राहक खरेदीसाठी येत नव्हते. पण, आता ग्राहकांची संख्या वाढू लागल्याने चिकनचे दर वाढण्यास सुरवात झाली आहे.

loading image