मुख्यमंत्री एका एसएमएसवर आले शेतकऱ्याच्या मदतीला

Udhav Thakare
Udhav Thakare

हिंगोली : तालुक्‍यातील केसापूर येथील शेतकरी डिझेल आणण्यासाठी शनिवारी (ता. चार) हिंगोलीत आले असता पोलिसांनी त्यांची दुचाकी पकडली. विनंती करूनही दुचाकी सोडलीजात नसल्याने शेतकऱ्याने शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसएमएस पाठविला. त्यानंतर काही मिनीटातच त्यांची दुचाकी सोडून देण्यात आली.

हिंगोली तालुक्‍यातील केसापूर येथील ज्ञानेश्वर टेकाळे हे शेतात ट्रॅक्‍टरद्वारे हळद काढणीचे काम करीत आहेत. शनिवारी (ता.चार) दुपारी त्‍याच्या ट्रॅक्‍टरचे डिझेल संपल्याने शेतातील काम बंद पडले. त्‍यामुळे श्री. टेकाळे दुचाकीवरून (एचएच ३८ एसक्‍यु २२६६) हिंगोलीकडे डिझेल घेण्यासाठी येत होते. या वेळी पोलिसांनी त्यांची दुचाकी अडवून जप्त केली. शेतात काम सुरू आहे, मला जावू द्या, अशी विनंती केली.

ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसएमएसद्वारे माहिती

 मात्र पोलिसांनी त्‍याला दाद दिली नाही. त्‍यानंतर श्री. टेकाळे यांनी ही माहिती शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांना दिली. त्‍यांनी देखील पोलिसांना विनंती करीत शेतकऱ्याची दुचाकी सोडून द्या, त्‍यांचे शेतातील काम थांबले आहे अशी विनंती केली. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर डॉ. शिंदे यांनी या घटनेची माहिती एसएमएसद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. सध्या ट्रॅक्टरद्वारे हळद पीक काढणी सुरू आहे. 

शेतकऱ्याची दुचाकी जप्त

ट्रॅक्टरला डिझेल लागत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी डिझेल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर जात आहेत. मात्र रस्त्यात पोलिस कर्मचारी गाड्या जप्त करत आहेत. हिंगोलीत शेतकरी ज्ञानदेव टेकाळे हे पंपावर गेले असता पोलिसांनी त्‍यांची दुचाकी जप्त केली आहे. शेतकऱ्यांना डिझेलसाठी मुभा देण्याची यावी, अशी विनंती त्यांनी एसएमएसद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

संबंधित यंत्रणेला केल्या सूचना

 त्‍यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला सूचना केल्या. त्यानंतर काही वेळातच श्री. शिंदे यांना फोन आला. पोलिसांनी शेतकऱ्याची दुचाकी सोडून दिल्याची माहिती त्यांना देण्यात आली. एका एसएमएसवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

मुंबईत अडकलेल्या नागरिकांना मदत

सेनगाव : तालुक्‍यातील चार नागरिक मुंबईत मालाड भागात अडकले आहेत. याची माहिती त्‍यांच्या नातेवाईकांनी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण महाजन यांना दिली. मुंबईत अडकलेल्या नागरिकांची होत असलेली गैरसोय सांगितली. त्‍यांनतर श्री. महाजन ही माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली. खासदार पाटील यांनी ही माहिती तातडीने मुंबईत येथे युवासेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांना दिली. त्यांनी मुंबईत अडकलेल्या सेनगाव तालुक्‍यातील चौघांची भेट घेवून त्‍यांना लागणाऱ्या सर्व वस्‍तूंसह किराणा सामान पुरविले. त्यांच्या कुटुंबीयांतून समाधान व्यक्‍त केले जात आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com