मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे उस्मानाबादेत, आपत्तीग्रस्त गावांची करणार पाहणी 

तानाजी जाधवर
Sunday, 18 October 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येत  असून तुळजापुर तालूक्यातील अपसिंगा व काटगाव या दोन गावांना ते भेट देणार आहेत.

उस्मानाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून मंगळवारी (ता.20) ते तुळजापुर तालुक्यातील गावाना भेटी देऊन तेथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पाच ते सहा दिवसापुर्वी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यामध्ये पिकाचे नुकसान झाले आहे. पिकासह, अनेक घराची पडझड झाली असून काहींच्या संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाल्याचे चित्र आहे. नदी, ओढा, बंधाऱ्याच्या शेजारील जमीनीत पाण्याचे वेगाने जमीनीतील मातीही वाहुन गेल्याचे चित्र आहे.

अशा या भयंकर नुकसानीच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्याकडुन होऊ लागली आहे. त्याच नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंगळवारी जिल्ह्यामध्ये येत आहेत. तुळजापुर तालूक्यातील अपसिंगा व काटगाव या दोन गावांना ते भेट देणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

असा असेल दौरा 

  • सकाळी आठ वाजता सांताक्रुझ विमानतळ येथून सोलापुरच्या विमानतळावर येणार असुन सव्वा नऊ सोलापुरच्या विश्रामगृहावर पोहचून साडेनऊ वाजता ते तुळजापुरला निघणार आहेत. 
  • सव्वा दहा वाजता काटगाव (ता. तुळजापुर) येथे येऊन तेथील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घराची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी  करतील. सव्वा अकरा वाजता अपसिंगा (ता.तुळजापुर) येथील पडझड झालेल्या घरासह शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन मुख्यमंत्री ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
  • या दोन गावाची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर तुळजापूर विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. जिल्ह्यात झालेल्या एकुण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.
  • त्यानंतर काही वेळ अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच एक ते पावणेदोन एवढा वेळ त्यानी विश्रामगृह येथे राखीव ठेवण्यात आला आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Thackeray Tuesday in Osmanabad