आधुनिक यंत्रांची कमाल! काही तासांतच पाच एकर ऊस तोडते

परमेश्वर कोकाटे
Thursday, 7 January 2021

ऊसतोड कामगाराची कारखान्याला कमी भासत नाही ऊसतोड कामगारांना पाच एकर ऊस तोडणीसाठी आठ ते दहा दिवस लागतात.

चितेगाव (जि.औरंगाबाद) :  दिवसेंदिवस ऊसाचे क्षेत्र वाढत असल्यामुळे साखर कारखान्यांना ऊसतोड कामगाराची कमी भासत आसल्याने हि कमी भरुन काढण्यासाठी आता आधुनिक यंत्रांद्वारे ऊस तोडणीसाठी केली जात आहे.

पैठणखेडा, केसापुरी, ईमामपुर, वाकी, नायगावखंडेवाडी, जयतपुर व हिरापुर (ता.पैठण) परिसरात दिवसेंदिवस ऊस लागवडीचे क्षेञ वाढत असल्यामुळे ऊसतोड कामगाराची कमी भासत आसल्याने आता साखर कारखानदारानी आधुनिक यंत्रांद्वारे ऊस तोडणी सुरु केली आहे. ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला की ऊसतोड कामगाराचे बैलगाडीसह तांडेची तांडे ऊसाच्या फडात दिसत होतो.

ऊसाचा ट्रॅक्टर उलटला जीवावर; भीषण अपघातात नवरा-बायको जागीच ठार

आता ही जागा आधुनिक यंत्राने घेतली आहे. परंतु दिवसेंदिवस ऊस कारखानदारांना ऊसतोड मजुरांची कमी भासत आसल्याने अनेक साखर कारखान्यानी आता आधुनिक यंत्रांद्वारे ऊस तोडणी सुरु केली आहे. यामुळे ऊसतोड कामगाराची कारखान्याला कमी भासत नाही ऊसतोड कामगारांना पाच एकर ऊस तोडणीसाठी आठ ते दहा दिवस लागतात.

पण या यंत्रांद्वारे एकाच दिवसात पाच एकर ऊसाचे बारीख तुकडे करुन ट्रॅक्टरमध्ये भरुन दिले जाते. शेतक-यास जनावरासाठी चारा म्हणून ऊसाचे वरचे हिरवे वाढे या मशिनद्वारे वेगळे काढले जाते. दोन तासात विस ते पंचवीस टनाचे एक ट्रॅक्टर भरले जाते. एक मशिन मागे दहा ते बारा ट्रॅक्टर रोज लागतात.या मशिनमुळे ऊस उत्पादक शेतक-यांचा व कारखान्याचा फायदा होतो.

लातूरकडे धान्य घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचा अज्ञाताकडून खून

ऊसतोड सुरु झाली कि आठ ते दहा दिवस शेतक-याला शेतात गुतुन राहावे लागते. या यंत्रांद्वारे  ऊस जमिन बरोबर तोडला जात आसल्याने खोडवा ऊसासाठी फुटव्याची संख्या वाढते.  साखर कारखान्याला ऊस तोडणीसाठी जास्त मजुरांची गरज पडत नाही. येणा-या काळात ऊस तोडणीसाठी मजूर मिळने अवघड होईल त्यामुळे आधुनिक यंञाव्दारे ऊस तोडणीसाठी केली जाणार आहे.

मशीनद्वारे एका दिवसात पाच एकर ऊस तोडला जातो. या मशिन बरोबर दोन पाच टनाचे हाॅड्रोलीक ट्रालीचे ट्रॅक्टर योजलेल्या ऊसाचा साठा करून ते इतर ट्रॅक्टर भरतात.दोन तासात अठरा ते विस टनाचे एक ट्रॅक्टर भरते.
- काकासाहेब मुळे, ऊसतोड यंत्र 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chitegaon aurangabad modern machine Within hours 5 acres sugarcane