esakal | पीडितेच्या किंकाळ्या ऐकू कशा येत नाहीत, ठाकरे सरकार असंवेदनशील  
sakal

बोलून बातमी शोधा

chitra wagh.jpg

पीडितेच्या किंकाळ्या ऐकू कशा येत नाहीत, ठाकरे सरकार  असंवेदनशील आहे, अशी टिका भाजपाच्या चित्रा वाघ यांनी केली. 

 

पीडितेच्या किंकाळ्या ऐकू कशा येत नाहीत, ठाकरे सरकार असंवेदनशील  

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : महिला आयोगाला अध्यक्षच नाही. राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तरीही सरकारला त्या पिडितांच्या किंकाळ्या ऐकू कशा येत नाहीत. आक्रोश कसा  दिसत नाही. महिलांचे व मुलींचे आब्रुचे रक्षण करता येत नसेल तर असले कायदे काय कामाचे असे सांगत भाजपच्या चित्रा वाघ राज्य सरकार गरजल्या. आणि महिलावर अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न न झाल्यास राज्यात मंत्र्यांच्या गाड्या अडवू असा इशाराही त्यांनी दिला. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तालुक्यातील एका विट भट्टीवर काम करणाऱ्या एका विवाहीत महिलेवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी अद्याप अटक नाहीत, त्यामुळे त्या पिडित महिलेच्या भेटीसाठी शुक्रवारी (ता. नऊ) श्रीमती वाघ आल्या होत्या. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी त्यांनी पिडित महिलेची भेट घेउन सांत्वन केले आणि भाजपकडून त्या महिलेला एक लाख रुपये मदत देण्यात आली.  वाघ यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांच्याशी चर्चा करून आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. 


त्यानंतर पालिकेत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्रीमती वाघ म्हणाल्या कि , राज्यात अद्याप महिला आयोगाला अध्यक्षच नाही, तर दाद कुणाकडे मागायची? राज्यात दिशा कायदा कधी आणणार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. राष्ट्रवादीवर टिका करताना त्या म्हणाल्या कि, सत्तेवर असणारे गेल्या वेळी विरोधात असताना महिलांच्या लैंगिक अत्याचार बद्दल रान उठवत होते. आता गप्प का आहेत असा सवाल करीत त्या म्हणाल्या कि, छत्रपती शिवबा, फुले, शाहू यांचे विचार प्रत्यक्षात कधी अमलात आणणार या पुढे राज्यात महिलावरील अत्याचार थांबले नाहीत तर मंत्र्यांच्या गाड्या अडविल्या जातील.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुद्धीजीवी प्रकोष्टचे प्रदेश संयोजक दत्ता कुलकर्णी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरीताई गरड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीनाताई सोमाजी, तालुकाध्यक्षा लक्ष्मी पांचाळ, आशाताई लांडगे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधव पवार, प्रदिप शिंदे, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, राजु मिणीयार, सुशांत  भुमकर, बालाजी पवार, आनिल बिराजदार, बालाजी कोराळे, नरेन वाघमारे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, नगरसेविका सुनंदा वरवटे, आकाश शिंदे, इराप्पा घोडके, अरूण ईगवे, पंकज मोरे, रोहीत सुर्यवंशी, किरण जाधव आदी उपस्थित होते.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
आरोपींना अद्याप अटक नाही ....

वीटभट्टीवर कामावर असलेल्या तीस वर्षीय महिलेला पळवून नेऊन आठवडाभर अत्याचार केल्याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.पाच) रात्री उशीरा अत्याचार व अॅट्रासिटी कायद्यान्वये चौघा तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पिडीत महिला कर्नाटकातील झळकी (ता. बस्वकल्याण) येथील पारधी समाजातील आहे. ती लक्ष्मी पाटी परिसरातील विटभट्टीवर काम करते. १९ सप्टेंबरला सलीम शानेदिवाण याने त्या महिलेला घरातून बाहेर आणले आणि लातूर मार्गे घेऊन गेले.

आठवडाभर तिच्यावर अत्याचार करून २६ सप्टेंबरला सलिमने त्या पिडीत महिलेला आदम, पतराज व शहारूख यांच्या ताब्यात दिले. या तिघांनी त्या महिलेला कळंब पोलिस ठाण्याजवळ नेऊन सोडले. महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने आई - वडिलांनी मुलीला गावाकडे नेले. पिडीत महिलेने सोमवारी (ता. पाच) उमरगा पोलिस ठाण्यात येऊन संपूर्ण हकीगत सांगितली. या प्रकरणी सलीम शानेदिवाण, आदम, पतराज व शहारूख यांच्याविरूद्ध अत्याचार व अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

(संपादन-प्रताप अवचार)