नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे ः पालकमंत्री चव्हाण

bhoakr.jpg
bhoakr.jpg


भोकर, (जि.नांदेड) ः मतदार संघीतील जनतेने मला समर्थपणे साथ दिली आहे, हे मी कदापी विसरू शकत नाही. तुमच्या सुखः-दु:खात मी सदैव पाठीशी आहे. तुम्ही चिंता करू नका. सुदैवाने मराठवाड्यात फारशी गंभीर समस्या अद्याप  निर्माण झाली नाही. भविष्यातही होऊ नये, सारे जण कोरोना मुक्त रहावेत अशी ईश्वराला मागणी आहे. नांदेड सह भोकर मतदार संघात संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. तीन) केले. 

शासनाने कंबर कसली
भोकर शहरात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर स्थानिक पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, देशात सध्या कोरोनाच्या विषाणुमुळे सारेच भारतीय हैरान झाले आहेत. यातुन सावरण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. मागील ८० वर्षांपुर्वी देशात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आज घडीला तसाच सामना करावा लागतो आहे. केंद्र आणि राज्यशासनाने वेळीच उपाययोजना म्हणून ‘लाॅकडाऊन’ जाहिर केले आहे. महाराष्ट्रात आघाडी शासन संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पालकमंत्री या नात्याने मी माझ्या नांदेड जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून तळ ठोकून आहे. विविध शासकीय अधिकारी व शासनातील वरिष्ठांनाही संपर्क करून आढावा घेत आहे. मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आहे.

भाजी मार्केट जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात
भोकरमध्ये नागरीकांना संचारबंदीच्या काळात भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेऊन मोंढ्यातील भाजीपाला बाजार आता रविवारी (ता.पाच) गर्दी टाळण्यासाठी शहरातील कीनवट रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात भरविला जाणार आहे. नागरिकांनी खरेदी करतांना खबरदारी घ्यावी. कृपया गर्दी करू नये. भविष्यात रेल्वेगेट जवळील मासळी बाजार व भाजीमार्केट ऊमरी रस्त्यावरील ओद्योगीक वसाहतीच्या प्रांगणात भरवीला जाणार आहे. संबधीत विभागाची परवानगी मिळावी म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com