बीड जिल्ह्यात कंटेनर उलटून क्‍लीनर जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

  • आष्टी तालुक्‍यातील धामणगावजवळील घटना 
  • लीनरचा दबून जागीच मृत्यू
  • अंभोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
  • अपघाती मृत्यूमुळे कुटुंब उघड्यावर

आष्टी (जि. बीड) - वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर उलटल्यानंतर केबिनमध्ये बसलेल्या क्‍लीनरचा दबून जागीच मृत्यू झाला. तालुक्‍यातील धामणगावजवळ गुरुवारी (ता. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. श्रीकांत अंकुश माने (वय 26, रा. सुरुडी, ता. आष्टी) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत माहिती अशी, की तालुक्‍यातील सुरुडी येथील परसराम मिसाळ हे कंटेनर (एमएच-46-एआर-3777) घेऊन बीडकडे निघाले होते. त्यांच्यासमवेत गावातील श्रीकांत माने हादेखील क्‍लीनर म्हणून गेला होता.

हेही वाचा - बीडमधून धनंजय मुंडे की सोळंके, मंत्रिपद कुणाला?

धामणगावजवळ आले असताना वळणावर चालक परसराम मिसाळ यांचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर उलटला. या अपघातात कंटेनर क्‍लीनरकडील बाजूने उलटल्याने श्रीकांतचा दबून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंभोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा - बालानगरच्या रानमेव्याची वाटसरूंना गोडी

पाच वर्षांपूर्वी वडिलांचा अपघाती मृत्यू 
पाच वर्षांपूर्वी श्रीकांतचे वडील अंकुश माने यांचाही पुण्याजवळ अपघाती मृत्यू झाला होता. यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी श्रीकांतवर आली. सुरवातीला गवंड्याच्या हाताखाली काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असे. मात्र, यात कुटुंबाचे भागत नसल्याने त्याने क्‍लीनर म्हणून काम सुरू केले होते. त्याच्यामागे आई, पत्नी असा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaner kills on the spot

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: