वादळाने हवेत धुळीचे लोट, उस्मानाबादेत वातावरणात बदल | Osmanabad News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyclone

वादळाने हवेत धुळीचे लोट, उस्मानाबादेत वातावरणात बदल

उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरणात धुळीचे लोट दिसत असून तापमानात किंचित बदल झाला आहे. दरम्यान धुळीच्या लोटामुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा पोहोचली आहे. तर आंब्यासह इतर पिकांना फटका बसला आहे. आसानी चक्रीवादळाचा फटका उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यालाही बसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सकाळपासूनच वादळी वारे वाहत आहेत. या वाऱ्याने हवेमध्ये धुळीचे लोट दिसत आहेत. त्यामुळे रस्त्यावर, घरात धूळच-धूळ पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना याचा चांगलाच फटका बसत आहे. (Climate Change Hit Osmanabad, Smog Cyclones)

हेही वाचा: PHOTOS | औरंगाबादमध्ये ३०० पेक्षा जास्त घरांवर बुलडोझर, कुटुंबांचा आक्रोश

धुळीच्या लाटेने दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडत आहे. दुचाकीवर जात असताना अचानक धुळीचे लोट समोर येत असल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला घ्यावी लागत आहे. सकाळपासूनच वाऱ्याचा वेग जास्त असल्याने रस्त्यावरील वाहतूकही काही प्रमाणात संथ गतीने सुरू होती. यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या कमी दिसत होती. दरम्यान धुळीचे लोट झेलत प्रवास करणाऱ्या काही दुचाकीस्वारांच्या डोळ्यांना चांगलीच इजा झाल्याचे नागरिक सांगत होते. काही जणांचा डोळ्यातून दिवसभर पाणी येत होते. तर काही जणांचे डोळ्यात काडीकचरा गेल्याने लाल झाले होते. त्यामुळे अनेकांना डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची वेळ आली.

हेही वाचा: बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल ? भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

तापमानात किंचित घट
दिवसभर सोसाट्याचा वारा सुरू असला तरी तापमान फारसे कमी झालेले नव्हते. सकाळी वातावरणात मोठी उष्णता होती. त्यामुळे उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत होत्या. मात्र सायंकळी पाच ते सहाच्या सुमारास वातावरणात किंचित बदल झाला. तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला. त्यामुळे तापमानात घट जाणवत होती.

आंब्यासह इतर पिकांना फटका
सध्या शेतकऱ्यांचा आंब्याचा मोसम सुरू आहे. विशेष म्हणजे यंदा पाऊस (Rain) मोठ्या प्रमाणात झाल्याने उशीराने आंब्याचे आगमन झाले आहे. यामध्ये केशर आंब्याचा बहर सध्या सुरू असून काढणीच्या टप्प्यावर आला आहे. मात्र सकाळपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या टप्प्यात आलेल्या आंब्याचे वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

Web Title: Climate Change Hit Osmanabad Smog Cyclones

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :OsmanabadCyclone
go to top