जिल्हाधिकारी देणार माहूरकडे लक्ष

माहूरला रेणुकादेवी मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांचा सत्कार करण्यात आला.
माहूरला रेणुकादेवी मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांचा सत्कार करण्यात आला.

माहूर - नांदेड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारताच सोमवारी (ता. १७) पहिल्याच दिवशी माहूर गडावर येऊन श्री रेणुकादेवीचे दर्शन घेऊन महाआरती केली.

नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे सोमवारी दुपारी तीन वाजता माहूरगडावर आगमन झाले. त्यांचे स्वागत तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी श्री रेणुकादेवीचा अभिषेक, पूजा करून दर्शन घेतले, महाआरती केली.

मंदिर परिसराची केली पाहणी
जिल्हाधिकारी श्री. ईटनकर यांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरातील श्री तुळजा भवानी माता, श्री महालक्ष्मी मातेचेही दर्शन घेतले. मंदिरात व मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची त्यांनी उपस्थितांकडून माहिती घेतली. किती कामे सुरु आहेत यासोबतच प्रस्तावित रोप-वे च्या कामांची माहिती त्यांनी घेतली. 

अनेकांनी केला सत्कार
श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे नूतन जिल्हाधिकारी बिपीन ईटनकर यांना प्रसाद व श्री रेणुकादेवीची प्रतिमा भेट देऊन सन्मान संस्थानचे सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव यांनी केला. या वेळी विश्वस्त बालाजी जगत, व्यवस्थापक योगेश साबळे, सुरक्षा अधिकारी प्रकाश सरोदे, महसूल कर्मचारी संतोष पवार उपस्थित होते. शासकीय विश्रामगृह येथे माहूरच्या नगराध्यक्षा शीतल जाधव, मुख्याधिकारी विदया कदम, माजी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी जिल्हाधिकारी बिपीन ईटनकर यांचा शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला.

श्रीकर परदेशी यांच्यानंतरचे दुसरे डॉक्टर
नागपूर येथील रहिवासी असलेले डॉ. विपीन ईटणकर यांचे एमबीबीएस या वैद्यकीय क्षेत्रातील पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील ‘आयएएस’ला देशात चौदाव्या, तर राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यशाला गवसणी घातली. २००९ ते २०१२ या कालावधीत जिल्हाधिकारीपदी रुजू असलेले डॉ. श्रीकर परदेशी यांचेही एमबीबीएस झाले होते. यानंतर नांदेडला याच क्षेत्रातील दुसरा जिल्हाधिकारी श्री. डॉ. विपीन यांच्या माध्यमातून मिळाला आहे. डॉ. विपीन यांनी गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) ता. २९ नोव्हेंबर २०१७ पर्यंत काम केले. यानंतर त्यांची बदली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. या ठिकाणी अडीच वर्षे पदभार स्वीकारल्यानंतर शासनाने त्यांची ता. १५ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

विकासकामांना प्राधान्य
माहूरगडावर श्री रेणुकादेवीचे दर्शन घेतले. मंदिर व परिसरातील कामांची पाहणी केली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांमध्ये लक्ष घालणार आहे.
- डॉ. विपीन ईटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com