जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त महिलांचा मोर्चा

उस्मानाबाद : हैदराबाद येथील घटनेच्या निषेधार्थ महिला समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा. (छायाचित्र ः राहुल कोरे, आळणीकर)
उस्मानाबाद : हैदराबाद येथील घटनेच्या निषेधार्थ महिला समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा. (छायाचित्र ः राहुल कोरे, आळणीकर)

उस्मानाबाद : हैदराबाद अत्याचार प्रकरणाचा तीव्र निषेध करीत शहरातील 21 महिला संघटनांनी एकत्रित येत महिला समन्वय समितीच्या माध्यमातून गुरुवारी (ता. पाच) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महिला अत्याचाराच्या घटना जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 

21 संघटना एकत्रित
हैदराबाद येथे डॉक्‍टर महिलेवर झालेल्या, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी महिलांच्या 21 संघटनांनी एकत्रित येत मोर्चा काढला. तुळजाभवानी स्टेडियमपासून मोर्चाला सुरवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदन संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, अत्याचारित महिलांची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी कायदेशीर योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. 

आरोपींना कडक शासन करा
या मोर्चामध्ये राष्ट्रसेविका समिती, धारासुरमर्दिनी महिला फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड, जैन महिला मंडळ, शताक्षी महिला मंडळ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गुरुवार महिला मंडळ, भावसार महिला मंडळ, तेजस्विनी महिला मंडळ, उद्योगिनी महिला मंडळ, महिला विधिज्ञ मंडळ, अक्षरवेल महिला मंडळ, नवनिर्मिती महिला मंडळ, आनंदी ब्राह्मण महिला मंडळ, नारीशक्ती महिला मंडळ, व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई महिला मंडळ, प्रगती महिला मंडळ, रेणुका मंडळ, अष्टभुजा महिला मंडळ, भारत संचार निगम लिमिटेड कर्मचारी महिला मंडळ, संमती ग्रुप, भाजप महिला आघाडी आदी संघटनांच्या महिला सहभागी झाल्या होत्या. बहुतांश महिलांनी काळ्या साड्या, काळा वेश परिधान करून या घटनांचा निषेध व्यक्त केला. स्त्रियांचा सन्मान करा, आरोपींना कडक शासन करा, अशा घोषणा महिलांनी यावेळी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com