हिंगोली जिल्हा परिषदेत अनुकंपा भरतीच्या हालचाली सुरु

जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी वारसदारांना नोकरी दिली जाते. अनुकंपा आधारावर त्यांचे कागदपत्रे तपासून प्रक्रिया पार पाडली जाते.
हिंगोली जिल्हा परिषद
हिंगोली जिल्हा परिषद

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात वर्ग तीन, वर्ग चार कर्मचाऱ्यांचे समायोजन करुन रिक्त असलेल्या पदावर अनुकंपा भरती प्रक्रिया सुरु केली जाणार असून हालचालींना गती आली आहे.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी वारसदारांना नोकरी दिली जाते. अनुकंपा आधारावर त्यांचे कागदपत्रे तपासून प्रक्रिया पार पाडली जाते. मागील वर्षी ६२ अनुकंपा आधारित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र मराठा आरक्षण यामुळे भरती प्रक्रिया खोळंबली. एकूण अनुकंपा आधारित जिल्हा परिषदेत ६२ पदे होती. त्यापैकी ५४ पदे भरण्यात आली. आता उर्वरित १५ पदासाठी हालचाली सुरु आहेत.

हेही वाचा - बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून करोडो रुपये लुटणाऱ्या टोळीला नांदेड, मुंबई, दिल्ली आणि लखनऊ या भागातून अटक करुन त्यांच्याकडून विस लाखाचा मुद्देमाल जप्त. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी (ता. २१) सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मागील वर्षी ५४ रिक्त पदे भरण्यात आली. आता उर्वरित पदे भरण्यासाठी सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांनी अनुकंपा भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरु केली आहे. काही दिवसात वर्ग तीन, वर्ग चार संवर्गातील अनुकंपा आधारित रिक्त पदे भरल्या जाणार आहेत.

मागील अनेक वर्षापासून अनुकंपा आधारित रिक्त पदे भरण्यासाठी आतापर्यंत अनेक अधिकारी येऊन गेले मात्र हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. धनवंत कुमार आल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील लोकांना दिलासा मिळाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com