नगरपंचायत निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार, जालना जिल्हा कार्यकारिणी बैठकीत निर्णय

उमेश वाघमारे
Wednesday, 30 December 2020

जालना  जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे, तसा निर्णय जिल्हा कार्यकारिणीच्या सोमवारी (ता.२८) झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.

जालना : जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे, तसा निर्णय जिल्हा कार्यकारिणीच्या सोमवारी (ता.२८) झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली. भगवान सेवा मंगल कार्यालय येथे सोमवारी पक्ष स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राजेश राठोड, डॉ. संजय लाखे, कल्याणराव दळे, विजय कामड, सत्संग मुंढे, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, पक्षनिरीक्षक अ‍ॅड. अनंतराव वानखेडे, अशोकराव पडघन, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद, प्रभाकर पवार, राम सावंत, एकबाल कुरेशी आदी उपस्थित होते.

 

 

 

बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील बदनापूर, जाफराबाद, मंठा आणि घनसावंगी नगरपंचायत निवडणुकांसंदर्भात तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, अण्णासाहेब खंदारे, सुरेश गवळी, विष्णू कंटोले, लक्ष्मण म्हसलेकर, शेख अन्वर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे यांनी माहिती दिली. नगरपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी सूचनाही करण्यात आली. त्यावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आगामी नगर पंचायतीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढविणार आहे, अशी घोषणा श्री. देशमुख यांनी केली. आमदार राठोड म्हणाले, की जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल.

 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Fight Municipal Council Elections In Jalna District