भाजपच्या महापौरांना काँग्रेसकडून बांगड्या, साडी चोळीचा आहेर

latur
latur

लातूर : शहरात समान विकास कामाचे वाटप करावे या मागणीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. यात नगरसेवकांनी महापौर सुरेश पवार यांना साडी, चोळी, बुरखा, बांगड्यांचा आहेर दिला. त्यानंतर बराच गोंधळ उडाला. महिला नगरसेवकांनी तर बराच वेळ ठिय्या आंदोलन केले. 

शहराच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. 19) महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ये कैसा भ्रष्टाचारी कानून है, ये तो अंधा कानून है अशा घोषणा देत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात एन्ट्री केली. सभागृह दणाणून सोडले. नगरसेवक युनुस मोमीन यांनी तर कोण निधी देता का निधी असा फलक व कावड गळ्यात अडकवून सभागृहात  एन्ट्री केली. महापौरांचा त्यांनी निषेध केला. घोषणा बाजीनंतर नगरसेवक महापौरांच्या डायसवर चढले. या वेळी घोषणाबाजी सुरूच होती. भ्रष्टाचाराचे आरोपही सुरूच होते. या गोंधळात महिला नगरसेवकांनी महापौर सुरेश पवार यांना साडी, चोळी, बुरखा, बांगड्यांचा आहेर दिला. या वेळी भाजप व काँग्रेसच्या महिला नगरसेवकात आहेर देण्यात येत असलेल्या साडी, बुरख्यावरून भांडणं झाली. त्यानंतर महिला नगरसेवकांनी महापौरांच्या समोरच्या जागेत ठिय्या आंदोलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com