Video : उनको तलाश किसी बेवफा की थी : नाराज आमदार गोरंट्याल देणार राजीनामा?

महेश गायकवाड
शनिवार, 4 जानेवारी 2020

माजी मंत्री राख यांच्यानंतर जालना जिल्ह्याला काँग्रेसकडून मंत्रीपद दिल्या गेले नाही. ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात आमदार कैलास गोरंनट्याल यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्याची होती. 

जालना : मंत्रिमंडळ विस्तारातून डावलल्याने जालन्यातील काँग्रेसचे आमदार  कैलास गोरंट्याल व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आमदार गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यासोबत शनिवारी (ता.4) बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीत कार्यकर्ते जी भूमिका घेतील त्यासोबत मी जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

'हम बावफा थे, 
करके उनके नजरो से गिर गये, 
शायद उनको तलाश 
किसी बेवफा की थी'
अशा आपल्या नेहमीच्या शायरीच्या अंदाजात त्यांनी मंत्रिपद न दिल्याची खदखद व्यक्त केली आहे.

वाचा - सत्तार नाराज झाले, औरंगाबादेत काय होणार?

मंत्रिमंडळाच्या विस्तारात जालना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री यांचा पराभव केला आहे. काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी जालना नगर पालिकेवर आपले वर्चस्व राखले आहे.

माजी मंत्री राख यांच्यानंतर जालना जिल्ह्याला काँग्रेसकडून मंत्रीपद दिल्या गेले नाही. ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात आमदार कैलास गोरंनट्याल यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्याची होती. 

मात्र, त्याची पक्षाकडुन दखल घेतली गेली नाही. 

त्यामुळे नगर पालिकेतील काँग्रेसचे पदाधिकारीही राजीनाम्याच्या तयारीत आहे. या नाराज कार्यकर्त्यांसोबत आमदार कैलास गोरंट्याल शनिवारी बैठक घेणार असून या बैठकीत कार्यकर्ते जी भूमिका घेतील त्यासोबत मी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नक्की वाचा - काय म्हणालेे संजय राऊत या मुद्दयावर?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Kailash Gorantyal News Jalna Breaking News