लातूर शहर महापालिकेवर काँग्रसेचा मोर्चा

हरी तुगावकर
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

महापालिकेच्या मालकीच्या दोन हजार गाळ्यांचे भाडे 10 ते 20 पट वाढविले आहे. सत्ताधाऱ्यांनी ही मोठ्या प्रमाणात भाडेवाढ आकारली आहे. या ठरावाप्रमाणे मनपा आयुक्तांना कार्यवाही करून भाडेवाढ करण्यास भाग पाडले जात आहे. या भाडेवाढीमुळे व्यापारीवर्गात मोठी नाराजी आहे.

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या गाळेभाड वाढ तसेच तसेच मालमत्ता करातही भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय  महापालिकेने घेतला आहे. याच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता. 20) महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा शहरातील व्यापारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आमदार अमित देशमुख यांनी महापालिकेच्या या धोरणाच्या विरोधात कडाडून टीका केली.

महापालिकेच्या मालकीच्या दोन हजार गाळ्यांचे भाडे 10 ते 20 पट वाढविले आहे. सत्ताधाऱ्यांनी ही मोठ्या प्रमाणात भाडेवाढ आकारली आहे. या ठरावाप्रमाणे मनपा आयुक्तांना कार्यवाही करून भाडेवाढ करण्यास भाग पाडले जात आहे. या भाडेवाढीमुळे व्यापारीवर्गात मोठी नाराजी आहे. तसेच शहरातील मालमत्ता करातीही मोठी वाढ केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. तरी देखील महापालिकेकडून वसुली सुरु आहे. याच्या विरोधात काँग्रेसने बुधवारी हा मोर्चा काढला. पक्षाचे झेंडे घेवून कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. गाळेधारकही या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार अमित देशमुख यांनी केले. त्यांनी महापालिकेच्या धोरणावरून टीका केली.

Web Title: Congress morcha of Latur City Municipal Corporation