महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या सुचनेनुसार व अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी तथा खासदार राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीत आज काँग्रेसच्या वतीने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसंच केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कृषी कायद्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
हिंगोली : शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ह शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ( ता. तीन) धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या सुचनेनुसार व अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी तथा खासदार राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीत आज काँग्रेसच्या वतीने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसंच केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कृषी कायद्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - नांदेड : रक्तपेढ्यांच्या गोरखधंद्यावर अंकुश बसणार, नियम डावलल्यास होणार कारवाई -
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ शहराध्यक्ष बापुराव बांगर तालुकाध्यक्ष शामराव जगताप, शेख नेहाल , दत्ता बोंढारे, केशव नाईक नगरसेवक अनिल नेनवाणी माबुद बागवान,आरेफ लाला मुजीब कुरेशी,जि.प.सदस्य एस.पी.राठोड तसेच विलास गोरे,आबेदअली जहागीरदार सलीमभाई पठाण,नजीर पठाण, नामदेवराव बुद्रुक, गजानन कवडे, अशोक चव्हाण, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जुबेर मामु,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष बंटी नागरे, दिपकसिंह गहिरवार, शासन कांबळे, विठ्ठल जाधव, राजदत्त देशमुख, अक्षय डाखोरे, संतोष साबळे, आशिष पुडंगे आदिंची उपस्थिती होती.
संपादन - प्रल्हाद कांबळे