विलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी

हरी तुगावकर
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विलासरावांच्या नावाचा फलक बसविण्यास टाळाटाळ केली. हे पाहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी
विलासरावांच्या स्मृति दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता. 13) रात्री या
फलकाची उभारणी करीत भाजपवर मात केली आहे.

लातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या
वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन
केंद्राला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेत
झाला होता. पण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विलासरावांच्या नावाचा फलक बसविण्यास टाळाटाळ केली. हे पाहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी
विलासरावांच्या स्मृति दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता. 13) रात्री या
फलकाची उभारणी करीत भाजपवर मात केली आहे.

महापालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱया या स्‍पर्धा परीक्षा प्रशिक्षण
केंद्रास लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्‍याचा ठराव काँग्रेसच्या
महापौर स्मिता खानापूरे यांच्या कार्यकाळात झालेल्या एका सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. याचा प्रस्ताव तत्कालीन स्वीकृत नगरसेवक रवींद्र पाठक यांनी आणला होता. या केंद्राच्या उभारणीस नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी स्‍थायी समिती सभापती असताना याकामी पुढाकार घेतलेला होता. सदर नाम फलक उभारण्‍यास सत्‍ताधाऱ्यांच्या वतीने टाळाटाळ करण्‍यात येत होती. याबाबत आठ दिवसांपूर्वी फलक उभारण्‍याची मागणी करण्‍यात आली होती. फलक उभारला नाही गेल्‍यास कार्यकर्ते स्‍वतः काम हाती घेतील असा इशारा देण्‍यात आला होता. तरीही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विलासराव देशमुख यांच्‍या स्‍मृतीदिनाच्या पूर्व संध्‍येस काँग्रेस कार्यकर्त्‍यांनी स्‍वतःहून हा फलक उभारला. हा फलक उभारणीसाठी नगरसेवक, कार्यकर्ते भिंतीवरही चढले होते. यापुढे

सत्‍ताधाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्‍या कार्यकाळातील कामे डावलण्‍याचा
प्रयत्‍न केल्‍यास अशा पद्धतीनेच कामे हाती घेण्‍यात येतील असा सूचक
इशाराही यावेळी देण्‍यात आला.

याप्रसंगी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक आयुब मणियार, रघुनाथ मदने, सुरज राजे, यशपाल कांबळे, जफर नाना, कुणाल वागज, मुस्तकीम सय्यद, खाजमिण्या शेख, जयकुमार ढगे, जाफर सय्यद, विशाल चामे, बालाजी सोनटक्के, अॅड. किशन शिंदे, कुणाल श्रंगारे, अजय वागदरे, अतिक शेख, अॅड. वसीम खोरीवाले, मुस्‍तकीम पटेल, सोहेल शेख, तौहीत खान, महेश ढोबळे, राम गोरड, करण कांबळे, ओमकार सोनवणे, प्रसाद शिगे उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Construction of Nameplate of Vilasrao Deshmukh Competition Center At Latur