
नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार शासन आणि प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सहकार्य करत आपापल्या घरातच थांबावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातील जनतेला केले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. या अनुषंगाने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. काल रविवारी (ता. २२) देशभरात पाळण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला नांदेडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा
जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे धन्यवाद देत असाच प्रतिसाद भविष्यातही देण्याची गरज असून संपूर्ण प्रादुर्भाव बंद होईपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यंत महत्त्वाच्या वेळी, जसे दवाखाना किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडावे आणि घरातच बसून राहावे. ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे सुट्ट्या देण्यात आले आहेत.
येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे
अशा सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपापल्या घरात राहूनच देशसेवा दाखवून द्यावी. सुट्ट्या मिळाल्या म्हणून फिरणे बंद करावे. जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य सेवा महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले आहे.
कर्मचाऱ्यांना शासनाने सुट्ट्या दिल्या
दरम्यान ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने सुट्ट्या दिल्या आहेत. असे अधिकारी व कर्मचारी बिनकामाचे रस्त्यावरून फिरताना आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करावेत. संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनी केली आहे.
येथे क्लिक करा - Video : १४४ कलमात दीडशहाणे पडले बाहेर, मग पोलिसांनी दाखवला इंगा
सव्वापाच हजाराची दारु जप्त
नांदेड : शहराच्या पावडेवाडी शिवारातील स्वराज बारसमोर एका झाडाखाली विनापरवानगी विदेशी दारु विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सव्वापाच हजाराची दारु जप्त केली. त्याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मरळक रोडवर पावडेवाडी शिवारात स्वराज हॉटेलजवळ दारु व्किरी करती असल्या माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस नाईक सखाराम नवघरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी कारवाई केली. पोलिसांनी दारु विक्री करणाऱ्या युवकास विदेशी दारुसह अटक केली. ही कारवाई रविवारी (ता. २२) दुपारी तीन वाजता केली. सखाराम नवघरे यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक बी. जी. बंडेवार करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.