असाल यंग; पण कोरोना दबंग

उमेश वाघमारे 
रविवार, 28 जून 2020

कोरोना विषाणूचा विळखा हा १६ ते ४५ या वयोगटांतील व्यक्तींमध्ये अधिक वाढल्याचे चित्र आहे.  शनिवारीच्या (ता.२७) अहवालानुसार याच वयोगटातील तब्बल २८३ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात ३१ ते ४५ या वयोगटातील तब्बल १५० रुग्णांचा समावेश आहे, तर १६ ते ३० या वयोगटांत १३३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा कोरोनाचा विळखा १६ ते ४५ या वयोगटांतील व्यक्तींना अधिक होत असल्याचे चित्र आहे. कारण शनिवारीच्या (ता.२७) अहवालानुसार १६ ते ४६ या वयोगटांतील तब्बल २८३ जण कोरोनाबाधित झाले आहेत. 

जालना जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्यास तयार नाही. उलट कोरोनाचा प्रसार मागील काही दिवसांमध्ये अधिक वाढल्याचे चित्र आहे. परिणामी कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही ४६२ झाली आहे. तर ३१७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

दरम्यान, कोरोना विषाणूचा विळखा हा १६ ते ४५ या वयोगटांतील व्यक्तींमध्ये अधिक वाढल्याचे चित्र आहे.  शनिवारीच्या (ता.२७) अहवालानुसार याच वयोगटातील तब्बल २८३ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात ३१ ते ४५ या वयोगटातील तब्बल १५० रुग्णांचा समावेश आहे, तर १६ ते ३० या वयोगटांत १३३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तसेच पंधरा वर्षांच्या आतील ५७ जण, ४६ ते ६० वयोगटातील ८७ जण कोरोनाबाधित झाले आहेत. अतिधोका असलेल्या साठीतील ३५ जण कोरोनाग्रस्त आहेत. 

हेही वाचा : जालन्यात कोरोनावर सोळा जणांची मात

घराबाहेर पडणाऱ्यांमध्ये १६ ते ४५ या वयोगटांतील व्यक्तींची संख्या जास्त आहे. त्यामुळे यात वयोगटांतील सर्वाधिक व्यक्तींना कोरोनाचा बाधा झाल्याचे चित्र आहे. अनेकदा तोंडाला मास्क, रुमाल न वापरणे, गर्दीत मिसळणे, फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर अशी अनेक कारणे आहेत. विनाकारण घराबाहेर फिरण्यापेक्षा स्वतःसह कुटुंबासाठी घरात राहणे हाच कोरोनापासून बचाव करण्याचा चांगला उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

शहरी भागात अधिक रुग्ण 

जिल्ह्यातील शहरी भागात आतापर्यंत एकूण तब्बल ३१० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागातही १५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र आहे. 

पुरुष बाधितांची संख्या अधिक 

कोरोनाबाधित रुग्णामध्ये पुरुषांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २८८ पुरुष हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर १७४ महिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona affected to young

टॅग्स
टॉपिकस