अरे बाप ! कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

उमेश वाघमारे 
Thursday, 4 June 2020

अंत्यविधीसाठी अनेक राजकीय नेत्यांसह सुमारे १०० जण अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले. दरम्यान, मृत रुग्णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जग झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून अंत्यविधीसाठी २० पेक्षा अधिक जण एकत्र आल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात तब्बल ९० ते १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जालना - जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कोरोना चाचणीसाठी नमुना घेतल्याचे माहिती असताना देखील अंत्यविधीसाठी सोमवारी (ता. एक) तब्बल शंभरपेक्षा अधिक जणांनी हजेरी लावली होती. दरम्यान, या साऱ्यांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील मोदीखाना येथील एका ज्येष्ठ नागरिकाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उपचारादरम्यान निधन झाले. मात्र, निधनाचे कारण स्पष्ट न झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेतले.

हेही वाचा : जालन्यात कोरोनाचा तिसरा बळी

त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. या कोरोना संशयिताचा अंत्यविधी नातेवाइकांनी पार पाडला.

हेही वाचा : अख्खा जेसीबीच विहिरीत गुडूप

या अंत्यविधीसाठी अनेक राजकीय नेत्यांसह सुमारे १०० जण अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले. दरम्यान, मृत रुग्णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जग झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून अंत्यविधीसाठी २० पेक्षा अधिक जण एकत्र आल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात तब्बल ९० ते १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केलाच कसा? 

उपचारादरम्यान निधन झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेतल्यानंतर त्याचा तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन कसा केला ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मुळात कोरोनाचाचणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व खबरदारी घेऊन अंत्यविधी होणे अपेक्षित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of people at funeral of corona patient