esakal | Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात दोन मृत्यू १११ बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

महापालिकेच्या वतीने बुधवारी (ता. दोन) शहरातील १४ केंद्रांवर १३२ व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये ११९ जण निगेटिव्ह आले तर १३ पॉझिटिव्ह आढळले. तसेच जिल्हाभरात दिवसभरात १११ बाधित तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात दोन मृत्यू १११ बाधित 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः महापालिकेच्या वतीने बुधवारी (ता. दोन) शहरातील १४ केंद्रांवर १३२ व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये ११९ जण निगेटिव्ह आले तर १३ पॉझिटिव्ह आढळले. तसेच जिल्हाभरात दिवसभरात १११ बाधित तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.  

महापालिकेच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट केंद्रांना गेल्या काही दिवसांपासून अल्प प्रतिसाद मिळत असून व्यापारी विक्रेत्यांनी या केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेने २८ जुलैपासून शहरात टेस्टला सुरवात केली होती. आतापर्यंत महापालिकेने शहरात सोळा केंद्र उभी केली होती. त्यापैकी सद्यःस्थितीत १४ केंद्रे कार्यरत आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून या केंद्रांवर रॅपिड टेस्टला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येते. सकाळी नऊ वाजल्यापासून डॉक्टर, तंत्रज्ञ पालिका कर्मचारी, परभणी योद्धे या केंद्रावर थांबत असून रॅपिड टेस्ट येणारी येणाऱ्या नागरिकांची संख्या मात्र तुरळक आहे. 

हेही वाचा - नांदेड : परभणीतून फरार झालेल्या कैद्याला भोकर पोलिसांकडून अटक

तपासणी प्रतिसाद थंडावल्याचे चित्र 
शहरात व्यापारी विक्रेत्यांची संख्या व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगार यांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत टेस्टची संख्यादेखील मात्र अल्प असल्याचे दिसून येते. त्यातूनही अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने वेळोवेळी व्यापाऱ्यांना रॅपिड टेस्टसाठी अल्टिमेटम दिलेला आहे. त्याचबरोबर एक दिवस कारवाई म्हणून काही दुकाने बंद देखील करण्यात आली होती; परंतु त्यानंतरही प्रतिसाद थंडावल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - वैद्यकीय प्रवेशासाठीचा 70-30 फार्मूला तात्काळ रद्द करा- माजी मंत्री डी.पी.सावंत

जिंतूरमध्ये सात; पूर्णेत १३ बाधित 
जिंतूर ः शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले व अन्य मिळून एकूण चाळीस नागरिकांची बुधवारी (ता. दोन) कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात बामणी प्लॉट भागातील एकाच कुटुंबातील दोन वर्षीय मुलीसह ४५ व २४ वर्षीय महिला आणि २१ वर्षीय पुरुष, ग्रीनपार्क भागातील ३३ वर्षीय पुरुष व नऊ वर्षीय मुलगा, तर हुतात्मा स्मारक भागातील ३२ वर्षीय महिला याप्रमाणे सातजण बाधित आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गंगाखेड शहरातील पाच व्यक्ती व तालुक्यातील मुळी येथील चार असे एकूण नऊ व्यक्ती पॉझिटिव्ह, तर मानवतला बुधवारी शहरातील पंचवटी कॉलनीत पाच, तर तालुक्यातील उक्कलगाव येथे एक असे एकूण सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. पूर्णा शहरात मंगळवारी (ता. एक) शहरात तीन, तर ग्रामीण भागात सात असे एकूण दहा, तर बुधवारी (ता. दोन) तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. मंगळवारी एकूण ५२ जणांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली. शहरात आदर्श कॉलनीत ४५ वर्षीय महिला, एस्सार पेट्रोल पंपाजवळील एकाच कुटुंबातील ५० वर्षीय महिला व २३ वर्षीय युवक, ग्रामीण भागातील सातेफळ येथे ६० वर्षीय पुरुष, १४ वर्षीय युवती, ५० वर्षीय महिला, एरंडेश्वर येथे ३४ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय युवक, २७ वर्षीय महिला, ४८ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळले. बुधवारी (ता. दोन) १६ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात शहरातील ४५ वर्षीय व ७० वर्षीय पुरुष, तर कंठेश्वर येथील ३२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळल्याची माहिती कोविड विभागाचे माधव आवरगंड यांनी दिली. तसेच सोनपेठमध्ये आठजण बाधित आढळले. यात शहरातील सात, तर एकजण ग्रामीण भागातील आहे. 


परभणी जिल्हा 
एकूण बाधित - दोन हजार ७६७ 
आजचे बाधित - १११
आजचे मृत्यु - दोन 
एकूण बरे - एक हजार ८५
उपचार सुरु असलेले - एक हजार ५५९
एकूण मृत्यु - १२३

संपादन ः राजन मंगरुळकर