esakal | आनंदाची बातमी: कोरोनाच्या नियंत्रणाबद्दल या जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाचे होतेय कौतूक
sakal

बोलून बातमी शोधा

IAS G. Shrikant

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने केलेल्या कणखर उपायोजनांचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी (ता. २७) कौतुक केले. झुमअॅपद्वारे घेतलेल्या बैठकीत त्यांनी पहिल्यांदाच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या भरीव प्रयत्नांबद्दल जिल्हाधिकारी श्रीकांत व सर्व टीमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

आनंदाची बातमी: कोरोनाच्या नियंत्रणाबद्दल या जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाचे होतेय कौतूक

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर: जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने केलेल्या कणखर उपायोजनांचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी (ता. २७) कौतुक केले. झुमअॅपद्वारे घेतलेल्या बैठकीत त्यांनी पहिल्यांदाच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या भरीव प्रयत्नांबद्दल जिल्हाधिकारी श्रीकांत व सर्व टीमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. यासोबत गंजगोलाई परिसरातील गर्दी रोखण्यासाठी श्रीकांत यांनी वाहन पार्कींगबाबत घेतलेल्या निर्णयाची पाठराखण केली.  

हेही वाचा- धक्कादायक: मुंबईहून गावी पळून आलेल्या जवानास कोरोना, गावही रेडझोनमध्ये

या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर सहभागी झाले होते.

श्री. देशमुख म्हणाले, ``कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करून जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणला आहे. यामुळे जिल्हाधिकारी श्रीकांत व प्रशासनाच्या सर्व टीमचे अभिनंदन आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण ९७ ते ९८ टक्के इतके आहे. सध्या उपचार घेत असलेले सर्व ५३ रूग्ण हे मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यातून प्रवास करून आलेले आहेत.

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

कोरोनाला रोखण्यासाठी चांगले काम झाले आहे. यापुढील काळात एकही पॉझिटिव्ह केस होणार नाही, यासाठी प्रशासनाने अधिक जागरूक राहून काम करावे. गंजगोलाईतील गर्दीची नाळ वाहन पार्कींगशी जुळली असल्याचे दिसून येताच जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी तातडीने उपाययोजना केल्याने चांगला परिणाम दिसून आला. गंजगोलाईला अनेक वर्षानंतर फिजीकल डिस्टन्शींग मिळून देणाऱ्या श्रीकांत यांच्या या निर्णयावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्या.

यात पालकमंत्र्यांच्या प्रतिक्रियेची सर्वांना उत्सुकता होती. ती दूर करत पालकमंत्री देशमुख यांनी श्रीकांत यांचे गंजगोलाई परिसरातील नो पार्कींगबाबतचे आदेश योग्य असल्याचे सांगितले व त्यांच्या निर्णयाची पाठराखण केली. या निर्णयामध्ये पुढील काळात सुलभता आणावी, परंतू शिथिलता देऊ नये, असेही सांगत श्रीकां यांनी पार्कींगबाबत चांगले पाऊल उचलले असून येत्या काळात महापालिकेने शासकीय जागेत पार्कींग स्लॉट करून वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था करावी, असे आदेश श्री. देशमुख यांनी दिले.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

loading image