esakal | बालकांमध्ये कोरोना संसर्ग वाढतोय, घाबरु नका तज्ज्ञांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus Government Medical College press conference in kolhapur marathi news

बालकांमध्ये कोरोना संसर्ग वाढतोय, घाबरु नका तज्ज्ञांचा सल्ला

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोना विषाणू Corona Virus संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या शेवटाची सर्वत्र चर्चा असताना जिल्ह्यात कोरोना Corona थांबायचे नाव घेत नाही. तपासणी वाढताच बुधवारी (ता. १४) कोरोना रुग्णसंख्येने दोनशेपर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे रुग्णसंख्येबरोबर बालकांमध्ये संसर्गाचे Corona Infected Children प्रमाणही वाढले आहे. मात्र, बालकांचे प्रमाण वाढले असले तरी घाबरु नका असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे. कोरेाना विषाणू संसर्गाच्या दुसरी लाट सर्वत्र ओसरत असताना जिल्ह्यात Beed रोज दीडशेंच्या दरम्यान रुग्ण आढळतात. तपासण्यांची संख्याही प्रशासनाने अधिक ठेवली आहे. साडेतीन ते चार हजारांच्या तपासणीत दीडशे ते पावणेदोनशे रुग्ण हे नित्याचे समीकरण झाले आहे. corona infection increases in children in beed, expert say do not fear glp88

हेही वाचा: सुखद! पाच महिन्यानंतर महिलेला मिळाले चोरीला गेलेले मंगळसूत्र

मंगळवारी (ता. १३) तपासण्यांची संख्या एक हजाराने वाढवून ५२३७ पर्यंत नेण्यात आली. यामध्ये तब्बल १९६ रुग्ण आढळले. तर, ५०४१ लोकांचे स्वॅब निगेटीव्ह आले. रुग्णसंख्या वाढली असली तरी तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले आहे. मागचे काही दिवस तीन ते साडेचार टक्क्यांपर्यंत असलेला पॉझिटिव्हिटी रेट बुधवारी ३.७४ टक्क्यांपर्यंत खाली आला.दरम्यान, जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ९४ हजार १३३ झाली असून मंगळवारच्या १२४ कोरोनामुक्तांसह जिल्ह्यात आतापर्यंत ८९७३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील एकूण १३१२ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ४१ रुग्ण बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असून जिल्ह्यात १२७१ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के. पिंगळे यांनी दिली. दरम्यान, २४ तासांत एक नवीन कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २५६५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी

दरम्यान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना प्रादुर्भावाचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत बालकांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण पाच ते आठ टक्क्यांपर्यंत गेले. आता हे प्रमाण वाढत आहे. बुधवारी १९६ रुग्णांमध्ये २४ बालकांना कोरोना विषाणू संसर्ग असल्याचे आढळल्याने ही त्याचीच तर वर्दी नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी चार ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. मात्र, संख्या वाढत असली तरी घाबरु नये असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे. विशेष म्हणजे बालकांना विविध लसींचे डोस अगोदरच दिलेले असल्याने त्यांना कोरेाना संसर्गाचा प्रादुर्भाव नगण्य असतो. अगदी यातील ९५ टक्के बालके अॅडमिट न होताही बरे होऊ शकतात. आतापर्यंत असेच दिसून आले आहे. अॅडमिट होणाऱ्यांपैकी ऑक्सिजनची गरज लागलेल्या बाल रुग्णांची संख्या एक टक्का आहे.

हेही वाचा: नांदेडकरांना दिलासा! दिवसभरात फक्त नऊ जण कोरोनाबाधित

‘म्युकर’जैसे थे

म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या आजाराच्या फैलावाला पुन्हा ब्रेक लागला आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या १९७ इतकी झाली आहे. यापैकी ७८ रुग्णांवर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात विविध शस्त्रक्रिया व उपचारानंतर ते बरे झाले आहेत. तर याच ठिकाणी आणखी ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. चार रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

आतापर्यंतच्या रुग्णांमध्येही आठ ते दहा टक्के बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. पण, अगदी सर्दी - ताप आजारांच्या औषधींनी ते बरे होतात. बालक गंभीर होण्याचे व त्यांना ऑक्सिजन लावावा लागण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत एकही बालकाच्या कोरोनामुळे मृत्यूची नोंद नाही. तरीही जिल्ह्यात उपचाराची पूर्ण सुविधा आहे. पालकांनी घाबरु नये.

- डॉ. सचिन आंधळकर, बालरोग तज्ज्ञ तथा सदस्य कोरोना जिल्हा बाल टास्क फोर्स.

loading image