esakal | BIG NEWS: औरंगांबादेतील बहीण-भावाच्या हत्याकांडामागे ओळखीचेच ?
sakal

बोलून बातमी शोधा

राजपूत.jpg
  • रेकॉर्डवरच्या दोघांसह अन्य दोघे ताब्यात 
  • आरोपींच्या शोधासाठी चार पथके 
  • पोलिसांकडून २१ सीसीटीव्हीची तपासणी 

BIG NEWS: औरंगांबादेतील बहीण-भावाच्या हत्याकांडामागे ओळखीचेच ?

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : सख्या बहीण-भावाची मंगळवारी (ता.नऊ) सायंकाळी हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर तपासाला वेग आलेला आहे. पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांसह अन्य दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली असून, खून करणारा ओळखीचाच असण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबादचा वाढतोय कोरोना मीटर, आज ७२ रुग्ण सापडले, ७८० बाधितांवर उपचारही आहेत सुरू   

घटनास्थळावरून चहाचे चार कप सापडल्याने हत्येचे गूढ आणखीनच वाढले असून, आरोपींच्या शोधासाठी चार पथके स्थापन केली आहेत. या कामी २१ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. एमआयटीसमोरील अल्फाईन हॉस्पिटलच्या मागे एका दोन मजली बंगल्यात लालचंद खंदाडे (राजपूत) हे पत्नी आणि दोन मुली व एका मुलासोबत राहतात. त्यांची जालन्याजवळ पाचनवडगाव येथे शेती आहे. मंगळवारी (ता.नऊ) पहाटे ते पत्नी आणि मोठ्या मुलीला घेऊन शेतावर गेले होते. तर किरण खंदाडे (वय १८) व सौरभ खंदाडे (वय १६) हे दोघेच घरी थांबले होते.

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा   

रात्री आठच्या सुमारास लालचंद हे पत्नी व मुलीसह घरी परतले. त्यावेळी बाथरूमजवळ बहीण-भावांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. रात्री उशिरापर्यंत पोलिस अधिकारी तळ ठोकत चौकशी करत होते. मात्र, अद्याप हत्येचा छडा लागलेला नाही.

रिकामे हात अन् हवालदिल मन...मजुरांची अशीही व्यथा   

बुधवारी गुन्हे शाखेच्या पथकाने दोन कुख्यात गुन्हेगारांसह अन्य दोघे अशा चार जणांना ताब्यात घेतले. चौघांमध्ये एकजण हा खंदाडे यांचा नातेवाईक असून, तिघे हे त्यांच्या मुलाचे मित्र आहेत. रविवारी (ता. सात) त्यांच्या घरात मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नातेवाईक आणि काही मित्र आले होते. त्यांना घरातील सर्व माहिती होती. शिवाय तांत्रिक तपासात त्यांचा संबंध आल्याने या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा शोध लावण्यासाठी गुन्हे शाखेचे तीन व सातारा पोलिसांचे एक असे चार पथक आरोपीच्या शोधासाठी कामाला लागले आहेत. 
दुभत्या गायी आणायच्या कशा ?  

ओळखीचा असेल तरच दरवाजा उघडायचे 
आई - वडील कामानिमित्ताने बाहेर जात असल्याने ओळखीचा कुणी असेल तरच दरवाजा उघडायचा अन्यथा नाही, अशा सूचना मुलांना देण्यात आलेल्या होत्या. मुले त्याचे पालन करीत असत. त्यामुळे ही हत्या कुणीतरी ओळखीच्याच व्यक्तीनेच केलेली असावी, असे जबाब देताना पोलिसांना सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे तपासही त्याच दिशेने सुरू असल्याचे सांगण्यात आले.