उस्मानाबाद आरोग्य विभागाने टाकली 'कात'  

2Osamanabad_20district_20Hospital.jpg
2Osamanabad_20district_20Hospital.jpg

उस्मानाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत कुचकामी ठरत असल्याची बाब समोर येत होती पण कोरोनाच्या साथीमुळे आरोग्य विभागाने जणू कात टाकत अनेक सुधारणा घडवून आणली आहे. त्याचाच परिणाम आता जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयामध्ये अत्यंत चांगल्या सुविधा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयाची नवीन सुसज्ज इमारत उपयोगाला आली. एरवी निधी देण्यासाठी सरकारकडे खेटे मारावे लागत होते, ते या काळात अगदी तातडीने झाले व बंद राहिलेल्या वास्तूमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. 


कोरोनामुळे अनेक गोष्टी वाईट झाल्या, त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला. पण ज्या पद्धतीने शासकीय रुग्णालयाची दर्जा असायला हवा होता. तो काही टिकला नसल्याची बाब यानिमित्ताने सगळ्यांच्या समोर आली. शासकीय रुग्णालय म्हणले की, लोकांच्या टीकेचा विषय ठरत असायचा. निधी यायचा पण विनियोग अगदी अल्प त्यातही गुणवत्तेच्या नावाने तीन तेरा वाजायचे. शासकीय रुग्णालयाची अवस्था मोडकळीस आल्याचे चित्र होते, हे चित्र बदलायची वेळ सरकारवर आली. कोरोनाच्या साथीने या दोन्ही सरकारच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयाचे खरे रुप समोर आले. आजवर केलेल्या खर्चाचा हिशोब सुध्दा मांडता येईल अशी परिस्थिती होती.

त्यातून सावरत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाचे खरे रुपडे पालटत आहे. ज्या अत्यावश्यक सुविधा गरजेच्या होत्या ते मिळणेही आता शक्य झाले आहे. अगदी ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या सुविधा मिळाल्याने भविष्यात नक्कीच आरोग्य यंत्रणेचा चांगला फायदा सामान्य रुग्णांना होणार आहे. एवढ्या सगळ्या वाइटातून जे काय घडले त्यातील ही एक चांगली बाब समोर आली आहे. सगळेच नकारात्मक असताना कुठेतरी चांगले चित्र यामुळे पाहायला मिळाले आहे, याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. भविष्यात आरोग्य विभागाला किती महत्त्व द्यायचे याचेही भान राज्यकर्त्यांना व धोरणकर्त्याने आले आहे. जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत एवढे वर्ष पडून होती, त्याला निधी मागुनही मिळत नव्हता.या अवघड परिस्थितीमध्ये इमारतीचा उपयोग अनन्यसाधारण होता,त्यामुळे त्याला निधी मिळून राहिलेल्या अपुऱ्या बाबी देखील पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com