esakal | तेलंगनात कोरोनाचा भूकंप, नांदेडला हादरे
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

विशेष काळजी म्हणून नांदेड पोलिसांनी सिमावर्ती भागात तगडा पोलिस बंदोबस्त तैणात केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी वेळोवेळी या महत्वाच्या पॉईन्टबद्दल माहिती घेत आहेत. 

तेलंगनात कोरोनाचा भूकंप, नांदेडला हादरे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या तेंलगनातील काही जिल्ह्यात कोरोनाच्या भूकंप झाल्याने त्याचे हादरे नांदेडला बसत आहेत. विशेष काळजी म्हणून नांदेड पोलिसांनी सिमावर्ती भागात तगडा पोलिस बंदोबस्त तैणात केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी वेळोवेळी या महत्वाच्या पॉईन्टबद्दल माहिती घेत आहेत. 

नांदेड जिल्ह्याला कर्नाटक व तेलंगना या राज्याच्या सिमा आहेत. त्यामुळे नांदेडमधून तेलंगना व कर्नाटक राज्यात व तेथून जिल्ह्यात नेहमी वर्दळ सुरु असते. तसेच शेतीच्या व अन्य रोजगारासाठी मोठ्या संख्येने लोकांची ये- जा असते. परंतु तेंलगना या राज्यात कोरोना या वैश्‍वीक महामारीने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. तेलंगनाच्या निझामाबाद, निर्मल आणि अदिलाबाद जिल्ह्यात कोरोनाचे पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेथील प्रशासनाने काळजी म्हणून लॉकडाऊन पूर्णपणे पाळत आहेत. 

हेही वाचापाल्याच्या ‘यशा’त पालकांची भूमिका महत्त्वाची, कशी? ते वाचाच

बासर नाका सिमेवर धर्माबाद पोलिसांचा चोख बंदोबस्त

तेलंगना या राज्यात जाण्यासाठी जिल्ह्यातील बिद्राळी, बेल्लुर व बन्नाळी या मोठ्या गावाजवळून मुख्य रस्ता आहे. बासर नाका येथे असलेल्या सिमेवर धर्माबाद पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. पोलिस निरीक्षक सोहन माचरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. उजगीरे, फौजदार श्री. कराड, श्री. सनगले यांच्यासह आदी पोलिस अधिकारी बासर नाका येथे सतत भेटी देऊन बंदोबस्त हाताळत आहेत. या सिमेवरुन अतायावश्‍यक सेवेतील वाहनांनाच फक्त प्रवेश दिल्या जात आहे. त्याही वाहनांची कसुन तपासणी करण्यात येत असल्याचे सोहन माचरे यांनी सांगितले. तसेच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार हे सुध्दा लक्ष ठेवून आहेत. 
 
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक लक्ष ठेवून

निझमाबाद, निर्मल आणि अदिलाबाद जिल्ह्यातील नेक नागरिकांना कोरोना या आजाराने त्रस्त केले आहे. तेलंगनात पसरलेला हा आजार नांदेड जिल्ह्यात येऊ नये याची काळजी व खबरदारी घेतल्या जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन हे सुद्धा या नाकांबदीवर लक्ष ठेवून असून वेळोवेळी ते पोलिस अधीक्षक श्री. मगर यांच्याशी चर्चा करत आहेत. 

येथे क्लिक कराVideo - पोलिसांच्या कष्टाला फळ, गुलाब पुष्पवृष्टीने झाले भाऊक

सूदैवाने जिल्ह्यात एकही पॉझीटीव्ह रुग्ण नाही

नांदेड जिल्ह्याच्या शेजारी असलेला हिंगोली, लातूर आणि तेलंगनातील काही जिल्ह्यात कोरोना या आजाराचे पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन हादरुन गेले आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरातून बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सूदैवाने जिल्ह्यात एकही पॉझीटीव्ह रुग्ण अद्यापर्यंत आढळला नाही. भविष्यातही ही परिस्थीती आपल्यावर येऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे.  

loading image