जालन्यात वीसजणांची कोरोनातून सुटका 

उमेश वाघमारे 
Thursday, 25 June 2020

जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांची भर पडत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचीही संख्या आता वाढू लागली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात वीस जणांवर यशस्वी उपचार करून त्यांना बुधवारी (ता. २४) डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जालना -  जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांची भर पडत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचीही संख्या आता वाढू लागली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात वीस जणांवर यशस्वी उपचार करून त्यांना बुधवारी (ता. २४) डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १४ कोरोनाबाधित रुग्णांची बुधवारी (ता.२४) भर पडली आहे.

त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत २७७ जण यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

जिल्ह्यात बुधवारी (ता. २४) १४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात शहरातील कादराबाद येथील दोन, मंगळबाजार येथील तीन, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक तीनमधील एक जवान, नाथबाबा गल्ली येथील तीनजण, मोदीखाना येथील एकजण, भोकरदन शहरातील नूतन कॉलनी येथील दोन, तर गोंदी (ता. अंबड) येथील दोनजण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

जिल्ह्यात बुधवारपर्यंत २४५ जणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यात शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात १४, मोतीबाग परिसरातील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २९, मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २६, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ५९, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे पाच, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे एक, अंबड येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ११, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे एक, भोकरदन येथील मुलींचे शासकीय वसतिगृह येथे तीन, घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे दोन, भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २७, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे नऊ, टेंभुर्णी येथील जे.बी.के. विद्यालय येथे २८, ई.बी.के. विद्यालय येथे ३० अशा २४५ जणांचा समावेश आहे. 

आतापर्यंत ८७२ गुन्हे 

लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. आतापर्यंत ८७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर १७१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे; तसेच ८२७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर २६ हजार ८०८ रुपयांचा मुद्देमाल व मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार तीन लाख ७६ हजार ९३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna