esakal | पंचवीसशेपेक्षा अधिक जण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

जालन्यात उपचार सुरु असलेल्या तब्बल ९६ कोरोनाबाधित रुग्णांना गुरुवारी (ता.२०) कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ५६१ जणांनी कोरोनाला हरविले आहे.

पंचवीसशेपेक्षा अधिक जण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची चार हजारांकडे वाटचाल सुरू असता कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचे चित्र आहे. गुरुवारी (ता.२०) तब्बल ९६ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ५६१ जणांनी कोरोनाला हरविले आहे.

दरम्यान, गुरुवारी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आतापर्यंत ११३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ७३ जणांचे अहवाल रात्री उशिरापर्यंत पॉझिटिव्ह आले. सध्या एक हजार २८७ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा गुरुवारी (ता.२०) मृत्यू झाला आहे. शहरातील अंबर हॉटेल परिसरातील ७८ वर्षीय महिला व नूतन वसाहत येथील ८५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत ११३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल तीन हजार ९६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन हजार ५६१ जण कोरोनामुक्त झाले आहे. यामध्ये गुरुवारी ९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये शहरातील नूतन वसाहत येथील १४ जण, राज्य राखीव दलाचे १३ जवान, दुर्गामाता रोड येथील १० जण, योगेशनगर येथील आठजण, तीर्थपुरी येथील पाचजण, सिंधीबाजार, रामनगर, आनंदावाडी व मुरमा येथील प्रत्येकी तीनजण, सोरटीनगर, संभाजीनगर, मुद्रेगाव, अन्वा पाडा, पारध, भोगाव व भोकरदन येथील प्रत्येकी दोनजण तर स्वामी समर्थनगर, गुडला गल्ली, कचेरी रोड, सामान्य रुग्णालय निवासस्थान, भाग्यलक्ष्मीनगर, माळीपुरा, रुक्मिणीनगर, शाकुंतलनगर, वराड रांपगडा, जळगाव सपकाळ, अंतरवाली राठी, शहागड, मानेगाव, कुंभारी पिंपळगाव, सिंदखेडराजा, जामवाडी, कचेरीवाडी, राजपूतवाडी, वडीरामसगाव, आनंदवाडी येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी ७३ जणांचे अहवाल रात्री उशिरापर्यंत पॉझिटिव्ह आले. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ९६१ बाधित झाले आहेत.  

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

जिल्ह्यातील ४१६ जणांना गुरुवारी (ता.२०) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे २३ जण, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे १९ जण, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे २४ जण, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे २७ जण, परतूर मॉडेल स्कूल येथे १६ जण, केजीबीव्ही येथे ४७ जण, मंठा येथील केजीबीव्ही येथे २६ जण, मॉडेल स्कूल येथे १२ जण, अंबड येथील येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ३२ जण, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे २९ जण, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ३४ जण, भोकरदन येथे शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ५४ जण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ४९, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे २३ जण, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे एक जणास संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

loading image
go to top