जालन्यात उपचारानंतर ८७ जण कोरोनामुक्त

उमेश वाघमारे 
Wednesday, 26 August 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येसह कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांतही वाढ होत असून, मंगळवारी (ता. २५) ८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येसह कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांतही वाढ होत असून, मंगळवारी (ता. २५) ८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ८१ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, एका कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

मागील पाच महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची भर सुरू असल्याने संख्या चार हजार पार झाली आहे; मात्र कोरोनाचा विळखा कमी होण्यास तयार नाही.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

मंगळवारी (ता. २५) जिल्ह्यात पुन्हा नव्याने ८१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यात जालना शहरातील सुखशांतीनगर, जाफराबाद, शेलूद व अंबड शहरातील म्हाडा कॉलनी, मंठा शहरातील अक्षय कॉलनी व बदनापूर येथे प्रत्येकी तीनजण, जालना शहरातील मोदीखाना, अंबड शहरातील श्रीकृष्ण मंदिर परिसर, मंठा शहरातील शिवनगर व जालना तालुक्यातील नेर येथील प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील सोनलनगर, आनंदवाडी, सामान्य रुग्णालय परिसरातील, गांधी चमन, श्रीकृष्ण रुख्मिणीनगर, सकलेचानगर, फुकटपुरा, संभाजीनगर, मिल्लतनगर, भोकरदन शहरातील देशमुख गल्ली, शेवगा, खासगाव, देऊळगाव उगले, रुई, सिंदखेडराजा, रामनगर कारखाना, इंदिरानगर, आष्टी, शेलगाव, सिरसवाडी, दुधना काळेगाव, अकोला, घनसावंगी, तांदुळवाडी, अंबड शहरातील नूतन वसाहत, सेलू (जि. परभणी), विडोळी (ता. मंठा), मंठा शहरातील मार्केटयार्ड, दावलवाडी, आंदरुड (ता. मेहकर), चिंचोली, अंबड शहरातील माळी गल्ली, सायगाव, चिंचखेडा, जाफरबाद शहरातील अंबेकर गर येथील प्रत्येकी एकजण असे एकूण ६३ व्यक्तींच्या आरटीपीसीआर तपासणी कोरोना पॉझिटिव्ह आली. तर अँटीजेन तपासणीद्वारे १८ कोरोनाचा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल चार हजार २२३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा कोविड रुग्णालय येथे उपचार सुरू असलेल्या देऊळगाव मही येथील ६५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, मंगळवारी ८७ कोरोनाग्रस्त रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये हसनाबाद येथील सातजण, जालना शहरातील खासगी रुग्णालय, परतूर व मंठा येथील प्रत्येकी सहाजण, जालना शहरातील दत्तनगर येथील चारजण, नळगल्ली, मुरारीनगर, शेलगाव व अरोडा तांडा येथील प्रत्येकी तीनजण, जालना शहर, हनुमाननगर, सोरटीनगर, रामनगर, बाळानगर, कादराबाद, भोकरदन शहरातील देशमुख गल्ली, फत्तेपूर, घनसावंगी, गुरुपिंपरी, तीर्थपुरी व तोलाजी आर्डा येथील प्रत्येकी दोनजण, चंदनझिरा, संभाजीनगर, संजयनगर, सुभद्रानगर, गुडलागल्ली, सरस्वती कॉलनी, राजपूत मोहल्ला, कंडारी (ता. अंबड), रोहनवाडी, अंकुशनगर, इंदेवाडी, पास्टा, देवपिंपळगाव, गाढेगव्हाण, वरखेडा, आष्टी, कुंभार पिंपळगाव, राजूरकर कोठा, पिंपळगाव रेणुकाई, सिरसगाव, राजूर, जळगाव, खडका येथील प्रत्येकी एकजण अशा एकूण ८७ रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत तब्बल दोन हजार ९८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna

Tags
टॉपिकस