जालन्यात कोरोनातून ८१ जण मुक्त 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.

जालना -  जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२८) उपचारानंतर  ८१ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.  आतापर्यंत तब्बल तीन हजार १५९ जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. सध्या एक हजार १४२ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कोरोना मीटर थांबण्यात तयार नाही. रोज नवीन कोरोनाबाधितांची भर पडत असून ६१ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात चार हजार ४३१ कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

जिल्ह्यात प्रत्येकी दिवसाला कोरोनाग्रस्तांची भर सुरू आहे. शुक्रवारी (ता.२८) ६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जालना शहरातील श्रीकृष्ण रुक्मिणीनगर व भाटेपुरी येथील प्रत्येकी तीनजण, घनसावंगी, लिंबोणी व हिसवपुरा येथील प्रत्येकी दोन, जालना शहरातील भाग्यनगर, गणेशनगर, नूतन वसाहत, युसूफ कॉलनी, विद्युतनगर, अंबड रोड, बदनापूर, ढाकेफळ, नेर, हिवरा रोषणगाव, बाजी उम्रद तांडा, पाथ्रुड तांडा, काजळा, उंबरखेडा (ता. मंठा), टेंभुर्णी, तडेगाव, कुंभारी, जानेफळ, रामसगाव, पानेवाडी, शंकरनगर (लोणार) बेथमल, बाबूलतारा, माळी गल्ली (बदनापूर ), पाडळी येथील प्रत्येकी एकजण असे एकूण ३७ जणांचे आरटीपीसीआर तपासणी पॉझिटिव्ह आली तर अँटीजेन तपासणीद्वारे २४ असे एकूण ६१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

कोरोनामुक्त झाल्याने शुक्रवारी ८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये जालना शहरातील नऊजण, संभाजीनगर येथील सातजण, आदर्श कॉलनी, सामान्य रुग्णालय परिसर, उस्वद (ता. मंठा) येथील प्रत्येकी चारजण, सेवली, जालना शहरातील भाग्यनगर येथील प्रत्येकी तीनजण, रंगारी गल्ली, मिशन हॉस्पिटल परिसर, बदनापूर व परतूर येथील प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील सरस्वती कॉलनी, जयभवानी गल्ली, गणपती गल्ली, अंबर हॉटेल परिसर, गवळी मोहल्ला, तट्टुपुरा, महावीर चौक, मिलनतनगर, समर्थनगर, नागेवाडी, नीळकंठनगर, कसबा, आनंदवाडी, साईनगर, सहकार बँक कॉलनी, कुचरवटा, कचेरी रोड, सतकरनगर, सोनलनगर, आनंदनगर, चिंचोली, देवगाव तांडा, जाफराबाद, नांदेड, घनसावंगी, वडाळी (जि. बुलडाणा), ढोकमाळ तांडा, विद्यानगर (सेलू, जि. परभणी), शिवाजी गल्ली, पिंपळखुटा, देऊळगाव मही, शंकरनगर (लोणार), सिव्हिल कॉलनी (देऊळगाव राजा), देवळा, दैठणा, खडका (ता. घनसावंगी), दुधना काळेगाव येथील प्रत्येकी एक असे एकूण ८१ कोरोनामुक्त झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com