जालन्यात पाऊणशे पॉझिटिव्ह 

उमेश वाघमारे 
Saturday, 18 July 2020

जालना शहरात कोरोनाचा प्रकोप सुरूच असून शुक्रवारी तब्बल ७६ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. सोबतच जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही साडेबाराशे पार झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जालना - शहरात कोरोनाचा प्रकोप सुरूच असून शुक्रवारी (ता.१७) ७६ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. सोबतच जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही साडेबाराशे पार झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरातील आहेत. त्यामुळे जालना शहराला कोरोनाचा वेढा पडल्याचे चित्र आहे. कोरोनाचा हा वेढा दूर करण्यासाठी शहरात मागील बारा दिवसांपासून लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनदरम्यान भाजीपाल्यासह किराणा दुकाने ही बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, शुक्रवारी (ता.१७) शहरातील ७६ जण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात अमित हॉटेल परिसरात १३ व मोदीखाना येथे १२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर रामनगर येथे सहा, संभाजीनगर, कन्हैयानगर, दर्गावेस गोल मशीद परिसर येथे प्रत्येकी पाच, आर.पी.रोड येथे चार, कादराबाद, पंचशील दवाखाना परिसर येथे प्रत्येकी तीन, नेहरूरोड, इतवार मोहल्ला, संग्रामनगर, दत्तनगर येथे प्रत्येकी दोन, नूतन वसाहत, पोलिस मुख्यालय, दानाबाजार, रहेमानगंज, कॉलेज रोड, कुंभार गल्ली, वल्ली मामू दर्गा, गुडला गल्ली, गळबाजार, साईनगर, गौतमनगर तसेच नंदुरबार येथील प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, जालना कोविड रुग्णालय येथे ४१४ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ३७ जणांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहे. तर आतापर्यंत ५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जालना शहरासह जिल्ह्यातील २९ जण कोरोनामुक्त झाले, त्यांना शुक्रवारी सुटी देण्यात आली आहे. यात संभाजीनगर येथील पाच, लक्कडकोट येथील तीन, मिशन हॉस्पिटल परिसर, नळगल्ली येथील प्रत्येकी दोन, छत्रपती कॉलनी, गोविंदनगर, कांचननगर, भालेनगरी, फूलबाजार, यशोदीपनगर, कन्हैयानगर, कालीकुर्ती, अमित हॉटेल परिसर, कादराबाद, मोदीखाना, खवा मार्केट, भाग्यनगर, महावीर चौक, शौला चौक, उम्रद (ता.जालना), देऊळगाव राजा येथील प्रत्येक एकजणाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७५६ जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. 

जिल्ह्यात ५४९ जणांचे संस्थात्मक अलगीकरण 

जिल्ह्यातील ५४९ जणांना शुक्रवारी संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे सात, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३०, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे ८४, गुरू गणेश भुवन येथे १२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ६१, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५३, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे नऊ, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे २६, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक येथे ८८, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक येथे ५५, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे आठ, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे पाच, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ४९, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १०, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सहा, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे १२, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे दोन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २४, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे तीन, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे पाचजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna