जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांची शंभरी 

उमेश वाघमारे 
Wednesday, 22 July 2020

शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग लॉकडाउननंतर वाढल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता.२१) एकाच दिवशी तब्बल शंभर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जालना - शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग लॉकडाउननंतर वाढल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता.२१) एकाच दिवशी तब्बल शंभर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या शंभर रुग्णांपैकी जालना शहरातील तब्बल ९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी कोरोनाबाधितांची संख्या ही तब्बल एक हजार ५४८ वर जाऊन ठेपली असून कोरोना मीटर अजूनही सुरूच आहे. 

जिल्ह्यात कोरोना मीटरने आता अधिक गतीने धावण्यास सुरवात केली आहे. जालना शहरातील १४ दिवसांचे लॉकडाउन सोमवारी (ता.२०) शिथिल करण्यात आल्याने बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना प्रसाराचा वेगही वाढ आहे.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) दिवसभरात तब्बल शंभर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक ९४ कोरोनाबाधित रुग्ण जालन्यात आढळून आले आहेत. शहरातील मोदीखाना येथे आठ, माळीपुरा येथे सात, सदर बाजार येथे सहा, गोपिकिशननगर, पुष्पकनगर येथे प्रत्येकी पाच, रामनगर येथे चार, रंगार खिडकी, व्यंकटेशनगर, मस्तगड येथे प्रत्येकी तीन, लक्कडकोट, मंगळबाजार, राणानगर, गुडलागल्ली, दुखीनगर, महिला व बालरुग्णालय कर्मचारी निवासस्थान, ख्रिस्ती कॅम्प, गांधीनगर, तेरापंथी भवन येथे प्रत्येकी दोन, विठ्ठल मंदिर, शाकुंतलनगर, राममंदिर, पिवळा बंगला, नया बाजार, महालक्ष्मीनगर, भाग्यनगर, सिद्धिविनायकनगर, दर्गावेस, कॉलेज रोड, तेरापंथी गल्ली, कालीकुर्ती, मलाव गल्ली, पोलासगल्ली, रुख्मिणीनगर, नाथाबाबा गल्ली, जवाहर बाग, गोपालनगर, शिवाजी पुतळा, अग्रसेननगर, सुखशांतीनगर, रामनगर ख्रिस्ती कॅम्प, जिजामाता कॉलनी, अमरेलनगर, विणकर कॉलनी, गोपाळपुरा, प्रशांतीनगर, स्वामी दयानंद रोड, वसुंधरा कॉलनी, दादावाडी नाथनी पेट्रोलपंप परिसर, ओमशांतीनगर, नळगल्ली येथील प्रत्येकी एकजणाचा समावेश आहे. तर भोकरदन तालुक्यातील बोरखेडी, जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा, घनसावंगी तालुक्यातील यावलपिंप्री, जालना तालुक्यातील हडप सावरगाव, रामनगर कारखाना, परतूर येथील लाहोटी हॉस्पिटल परिसरातील प्रत्येक एकजण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

दरम्यान, सध्या जालना येथील कोविड रुग्णालय येथे ५४२ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ४० जणांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहे. तर आतापर्यंत ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

उपचारानंतर १८ जण कोरोनामुक्त 

जालना कोविड रुग्णालय येथे उपचाराअंती मंगळवारी (ता. २१) १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात कन्हैयानगर येथील पाच, पेन्शनपुरा येथील चार, नळगल्ली येथील दोन, शाकुंतलनगर, कचेरी रोड, भीमनगर, रामनगर, नळगल्ली, कालीकुर्ती, आनंदीस्वामी गल्ली, माणिकनगर येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत उपचाराअंती ९१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात ७७४ जण संस्थात्मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ७७४ जणांना मंगळवारी (ता. २१) संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०१, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३७, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १८१, गुरुगणेश भुवन येथे १, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ८१, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह येथे १०, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ६९, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ४२, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे ३४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे २८, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे ४१, अंबड येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ४५, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे २७, घनसवांगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे एक, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे तीन, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ५२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १८, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे तीन जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna